नगरच्या राहणेचा ऑस्ट्रेलियावर दबदबा मेलबर्न,ऑस्ट्रेलिया –


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलिया वरती आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.


या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पार पाडली. सामन्याचा पहिल्या डावामध्ये अजिंक्यने 112 धावांची शानदार खेळी करून संघाला सावरले आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये गोलंदाजांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कमी धावसंख्येवर रोखून ठेवले.

अजिंक्य रहाणे हा तसा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार, परंतु कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे संघाची धुरा अजिंक्यच्या हातात आली आणि या मिळालेल्या संधीच अजिंक्यने पहिल्याच सामन्यामध्ये सोने केलेले पाहायला मिळाले. सामन्याच्या पहिल्या डावामध्ये अजिंक्य 112 धावांवर खेळत असताना रवींद्र जडेजा च्या चुकीमुळे धावबाद झाला.

परंतु त्याच्यावर कुठलाही राग न दाखवता अजिंक्यने जडेजाची समजूत काढून त्याला प्रोत्साहन दिले. क्रिकेटमध्ये असं क्वचितच पाहायला मिळतं की धावबाद झालेला फलंदाज हा ज्याच्या चुकीमुळे धावबाद झालाय त्या फलंदाजाला सहानुभूती आणि प्रोत्साहन देतो. आणि याच गोष्टीमुळे अजिंक्य सर्व क्रिकेटप्रेमींचा जेंटलमन बनला आहे.

तसेच आज दुसऱ्या डावामध्ये त्याने नाबाद 27 धावांची खेळी करून भारतीय संघाला आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. या सामन्याच्या विजयाबरोबरच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया बरोबर मालिकेमध्ये १-१ अशा बरोबरीत आला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये भारतीय संघ खूप निराशाजनक परिस्थिती मध्ये पराभूत झाला होता.

आणि त्यातच पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये संपूर्ण भारतीय संघ हा फक्त 36 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे भारतीय संघांवर सगळीकडून जोरदार टीका होत होती. त्यामुळे आज मिळालेला विजय हा क्रिकेटप्रेमींना तर आनंदाचा आहेच, त्याचबरोबर भारतीय संघाला मालिकेमधील राहिलेल्या सामन्यांमध्ये नक्कीच प्रोत्साहन देईल.

आणि भारतीय संघ इतर सामन्यांमध्ये विजय मिळवेल व मालिका आपल्या खिशात घालेल अशी अपेक्षा आता क्रिकेटप्रेमी अजिंक्या कडून करत आहेत.


अजिंक्य रहाणे आपल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर चा रहिवासी आहे. त्यामुळे हा विजय नगरकरांसाठी मान उंचावणारा आहे. अजिंक्य रहाणे येणाऱ्या सामन्यांमध्येही जोरदार कामगिरी करेल अशी नगरकरांची अपेक्षा आहे. अनेक अजिंक्य राहण्याचे चाहते समाज माध्यमांच्या माध्यमातून अजिंक्य राहणेला शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे तो समाज माध्यमांमध्ये खूपच चर्चेत आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.