प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटामध्ये बो-ल्ड सिन शूट करत असताना माझ्या शरीरात…’


सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलीवूड मधील आपल्या करीयरची 20 वर्षे पूर्ण केली आहेत आणि एवढ्यातच  तिच्या ‘ऐतराज’ या फिल्मला देखील  16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपणा सर्वांना माहित असेलच की ऐतराज चित्रपटामध्ये प्रियंका चोप्राने एका धाडसी मुलीची भूमिका साकारली होती.

  ‘ऐतराज’  या चित्रपटामध्ये ती नकारात्मक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली होती. या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवरती  एक पोस्ट केली होती व  त्यामध्ये तिने असे लिहिले होते की किती अवघड प्रवास होता हा. या चित्रपटात काम करणे आपल्यासाठी किती अवघड होते हे प्रियंका चोप्राने सांगितले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर  ऐतराज चित्रपटाची आठवण करून देत असताना प्रियांका चोप्राने लिहिले की सन 2004 साली झालेल्या अब्बास-मस्तानच्या थ्रिलर ऐतराज या सिनेमा मध्ये  सोनिया रॉयची भूमिका केली होती. प्रियंका म्हणते मी आत्तापर्यंत साकारलेल्या अनेक पात्रांपैकी हे सर्वात  धाडसी भूमिका होती आणि ही माझ्यासाठी खूप मोठी रीस्क होती. पण मी ती स्वीकारली व पार पाडली.

प्रियंका पुढे म्हणते त्यावेळी मी सिनेमा सृष्टीमध्ये  नवीन होते.   सुरुवातीला  मला देखील  खूप भीती वाटत होती,   परंतु माझ्यातला कलाकार मला असे  सांगत होता की मी नवीन काहीतरी धाडसी काम करावे आणि माझ्या मते सोनिया हीच ती व्यक्तिरेखा होती.

धूर्त, शिकारी, स्वत: च्या मनात अडकलेली आणि आश्चर्यकारक पणे भावनिक अशी ही भूमिका होती. प्रियांका चोप्राने  या चित्रपटासंदर्भात एक व्हिडिओ क्लिप  देखील शेअर केली आहे आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियांका चोप्राने काही मजकूर  लिहिला आहे तो असा की, अब्बास-मस्तान याची मी  कायम या पत्रासाठी आणि माझ्यासारख्या नवख्या मुलीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी सदैव आभारी राहीन.

चॅनल सबस्क्राईब करा.

मला आज एका गोष्टीचा अभिमान वाटतो की, हे  पात्र साकरण्यासाठी  माझ्यातील ओळखलेले टॅलेंट आणि माझ्यावर ठेवलेला तो विश्वास, 16 वर्षांनंतर जेव्हा मी पाठीमागे वळून पाहते तेव्हा हा चित्रपट माझ्यासाठी गेम चेंजर वाटतो. या चित्रपटाने मला  आत्मविश्वासाने प्रत्येक भूमिका साकारण्याची कला दिली.

2004 साली बॉक्स ऑफिसवर  ऐतराज हा चित्रपट  प्रचंड  लोकप्रिय ठरला होता आणि या चित्रपटमध्ये प्रेक्षकांनी प्रियांकाची ती भूमिका चांगलीच पसंत केली  होती. सन 2020 मध्ये प्रियांका चोप्राने बॉलीवूड इंडस्ट्रीतमध्ये आपल्या करीयर ची 20 वर्षे पूर्ण केली आहेत.

आपणा जर हा सिनेमा पाहिला असेल तर आपल्या लक्षात येईल की या सिनेमामध्ये  प्रियांकाने बरेच बोल्ड सीन दिले होते, आणि या सीनचे  शूटिंग करत असताना  स्वत: वर नियंत्रण ठेवणे एवढे सोपे नव्हते. परंतु प्रियंका चोप्राने  हा रोल अगदी सहजपणे  साकारला होता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.