शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स.
शिवसेना पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरनाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०२० मंगळवारी त्यांना ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस वर्षा राऊत यांना बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीसाठी त्यांना हजर राहावे लागणार आहे.
पीएमसी बँकेच्या घोटाळ्याबाबत ईडीकडून काही लोकांची चौकशी सुरू आहे. एका जुन्या प्रकरणामध्ये चौकशीमध्ये वर्षा राऊत हे नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.
या अगोदर देखील अनेक महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहेत. याबाबत महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून इडीवर कडाडून टीका देखील करण्यात आल्या. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावरती जोरदार टीका केलेली आहे. संजय राऊत यांच्या पत्नीलाच ईडीकडून नोटीस आल्यामुळे, संजय राऊत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.काही दिवसांपूर्वीच भोसरीमधील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडी कडून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांना बजावण्यात आली आहे. आपण ईडीच्या चौकशीला हजर राहणार असून त्यासाठी मुंबईला जाणार आहोत, असे एकनाथ खडसे म्हणाले
एकनाथ खडसें यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. “आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असे संजय राऊत म्हणाले होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.