इतिहास लिहिला जाईल, शरद पवार तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल,



‌ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद   पवार यांच्यावर   विरोधी गटातील एका नेत्याने  जहरी टीका केली आहे . ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”,  अशी जहरी टीका या नेत्याने केली आहे.

”शरद  पवार साहेबांचे कोणी मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलत   असतात .जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी  त्यांच्या आत्मचरित्रामध्ये देखील त्यांनी  तसे लिहून ठेवले आहे, अशी   देखील  टीका शरद   पवार  यांनी केली आहे.

मार्केट कमिटीमध्ये मालाच्या विक्रीबाबत   शरद पवार हे विरोध करत असतात आणि मात्र   शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता आहेत ” अशा  शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हा नेता कोण? तर त्याचे उत्तर आहे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत यांनी अशा प्रकारे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

माजी मंत्री  सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली.  24 डिसेंबर रोजी ही यात्रा सुरू होत आहे. तर  27 डिसेंबर पर्यंत ही यात्रा असणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन झाले. 

सांगली जिल्ह्यातील  किल्ले मच्छिंद्रगड गावामधून म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावामधून या  यात्रेची सुरूवात झाली असून, या यात्रेची सांगता इस्लामपूर या ठिकाणी एक जाहीर सभा होणार आहे व या सभेनेच या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. या सभेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हजेरी लावणार आहेत.

ही यात्रा एकूण तीन दिवस सुरू राहणार आहे. चार टप्प्यामध्ये या यात्रेचे नियोजन असणार आहे.  पहिल्या टप्प्यामध्ये  सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांची यात्रा असणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ असे संपूर्ण राज्यामध्ये ही यात्रा पुढील टप्प्यामध्ये  असणार आहे.  शिरोळ, इचलकरंजी, पेठ वडगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी सभांचे करण्यात   येणार आहे. या सभांना भारतीय जनता पार्टी  आणि भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष यांना  बोलवले जाऊ शकते अशी चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीचे या यात्रेमध्ये अप्रत्यक्ष संबंध असल्यामुळे खोत यांच्या या यात्रेवर टीका होऊ लागली आहे. कारण  यात्रेची सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या  आशिष शेलार यांच्या हस्ते आणि सांगता देखील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळेच या यात्रेवर टीका केली जात आहे.

पुढे बोलत असताना सदाभाऊ  खोत  यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टिकास्त्र सोडले. दिल्लीमध्ये  सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांचे  नाहीच. दिल्लीतील  आंदोलन हे  दलालांनी पुढाकार घेऊन निर्माण केले आहे.  स्वतःच्या  राजकीय स्वार्थापोटी काही लोक अशा प्रकारे  शेतकऱ्यांची दिशाभूल करताना पाहायला मिळत आहेत. हे लोक स्वतःला  शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी जहरी  टीका खोत यांनी केली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.