पाच महिन्यांची गरोदर असूनही ‘ती’ १० किलोमीटर स्पर्धेत जिंकली. वाचा सविस्तर!

असं म्हणतात,जगात अशक्य काहीच नसतं. तुम्ही जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनापासून प्रेयत्न केले,शंकेला आसपासही फिरकू दिले नाही,तर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अंकीता गौर या अभियांत्रिकी मुलीने ‌पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे.

५ महिन्याची गर्भवती असूनही बंगळूरच्या अंकिता गौर या अभियांत्रिकी मुलीने धावण्याच्या स्पर्धेत १०किलोमिटर अंतर ६२ मिनीटात पूर्ण करत एक अजब कारनामा करून दाखवल्याची घटना घडली आहे. अंकिता गौर हीने करून दाखवलेल्या कारनाम्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरवर्षी होणाऱ्या टिसीएस वर्ल्ड 10k स्पर्धेत अंकिता गौर हीने हा पराक्रम करून दाखवला. मे जूनमध्ये होणारी टिसीएस वर्ल्ड 10k ही स्पर्धा यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये घेण्यात आली. टिसीएस वर्ल्ड 10k ही स्पर्धा २००८ पासून ‌नियमित सुरू असून मे जूनमध्ये होत असते.

मिळालेल्या माहितीनुसार,अंकिता हीने या स्पर्धेत यापूर्वी २०१३ साली देखील भाग घेतला होता. या स्पर्धेव्यतीरीक्त अंकिताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. परंतु यावेळी या स्पर्धेत भाग घेणं तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. कारण ती पाच महिन्यांची गर्भवती होती.

माध्यमांशी बोलताना अंकीता म्हणाली, धावणे हे माझ्यासाठी ‘ऑक्सिजन’ प्रमाणे आहे. गेली नऊ वर्षे मी नियमित धावत आहे. गरोदर असूनही मी दररोज आठ ते नऊ किलोमीटर धावत आहे. अशा परिस्थितीत मी रोज आठ नऊ किलोमीटर धावत होते,ही जमेची बाजू असली तरी,याला वेळेची मर्यादा नव्हती. या उलट या स्पर्धेत वेळेची मर्यादा असल्याने हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. मात्र यश मिळाल्यामुळे केलेल्या मेहनतीचे फळ तर मिळालेच,परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, झालेला आनंद हा येणाऱ्या काळात उर्जा देउन जाणारा नक्कीच ठरणार आहे. असं अंकिता गौर आपला आनंद व्यक्त करताना म्हटली.

अंकिता पुढे म्हणाली,या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी मी सर्व टेस्ट करून घेतल्या. डॉक्टरांनी होकार दिल्यानंतरच मी या स्पर्धेत भाग घेतला. आई वडील आणि नवऱ्यानेही मला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मला मिळालेल्या यशात सर्वांचा वाटा असून मी खूप आनंदात असल्याचं शेवटी अंकिताने माध्यमांशी बोलताना म्हटलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.