कृषी कायद्याचा मंगल कलशाचा दूध अभिषेक
नांदेड. दि.१४/१२/२०.
रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर कृषी कायद्याचा मंगल कलशाला दूध अभिषेक घालण्यात आला. तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्याला खुल्या बाजाराचे स्वातंत्र्य देणारे आहेत व शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या विरोधातील कायदे आहेत,कृषी कायद्याला समर्थन द्या अशा आशयाचे फलक पदाधिकाऱ्यांनी हातात घेऊन कृषी कायद्याचे स्वागत केले. व घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण साले,रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, अरुण पोफळे (भाजपा युवा मोर्चा, शहर सरचिटणीस), सचिन कदम (जिल्हा अध्यक्ष, सोशल मीडिया रयत क्रांती संघटना )विठ्ठल इंगोले ( तालुकाध्यक्ष, अर्धापूर, रयत क्रांती संघटना) नितीन आबादार (जिल्हा सचिव )बालाजी पांचाळ, निलेश ढवळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.