नातेपुते पोलिसांची अवैध धंदे व वाळू तस्करांवर कारवाई

नातेपुते पोलिसांची अवैध धंदे व वाळू तस्करांवर कारवाई
नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक(PSI) युवराज खाडे  यांची कोकणामध्ये बदली झाली.  युवराज खाडे यांच्या बदलीनंतर सांगोला येथून मनोज सोनवलकर यांची नातेपुते पोलीस स्टेशन ला बदली झाली आहे.  मनोज सोनवलकर यांनी नातेपुते पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.

मनोज सोनवलकर यांनी सुरुवातीलाच  गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांना कायमच न्याय देण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले होते. बोलण्यापेक्षा करून दाखवू असे म्हणाले होते.
त्यांनी आपल्या शब्दाप्रमाने कारवाईला सुरुवात देखील केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये नदी, ओढे, तलाव या ठिकाणी वाळू चोरी करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई केली आहे. कारुंडे, मांडवे,डोंबाळवाडी,नातेपुते या ठिकाणी कारवाई करून वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. नैवद्य पणे वाळू उपसा करत असताना ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. एक टिपर, एक ट्रॅक्टर,  ट्रॉली, २ छोटा हत्ती, तसेच ६ ब्रास वाळूसह तब्बल २९ लाख ७५ हजार एवढा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवैध दारू  विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल:

गुरसाळे धर्मपुरी नातेपुते फोंडशिरस याठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तब्बल अकरा जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 15 लिटर हातभट्टी दारूसह, देशी व विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस  तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशानुसार व अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे,  अकलूज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस पोलीस निरीक्षक  मनोज यांनी कारवाई  केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस करत आहेत.

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/KIqIFtCCmB18CP1c0hB6A3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.