नटराजन,पांड्याने केली कमाल; भारताचा सलग नऊवा t20 विजय वाचा सविस्तर!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या t20 सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या तडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली.

भारताने एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर t20 मालिकेत या पराभवाची परतफेड करण्याची एक संधी भारताकडे होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने विजय मिळवत आपण पटरीवर आल्याचे संकेत दिले होते. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली. मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. आणि भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

तिसरा एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ लयीत आल्यानंतर टी-20 मालिकेत देखील भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवत 2-0 अशी मालिका जिंकली. या विजयाबरोबर भारताने सलग नऊ टी-20 सामन्यात विजय मिळवण्याचा कारनामा देखील केला आहे.

या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा नटराजनने आपला जलवा दाखवला. दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये यॉर्कर म्हणून उदयास आलेल्या नटराजनने सलग दुसऱ्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. नटराजनने 4 षटकांत अवघ्या वीस धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. शमी आणि बुमरा या दोन प्रमुख गोलंदाजाशिवाय भारतीय संघ या सामन्यात उतरला होता. याचा फटका भारतीय संघाला बसला. नटराजन व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही.

नटराजन नंतर या सामन्यात हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केलेला फटकेबाजीने खूपच आकर्षित केले. विराट कोहली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ठेवलेले आव्हान अशक्यप्राय वाटत होते. मात्र हार्दिक पांड्याने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत,भारताला शेवटच्या षटकात फटकेबाजी करत विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने अवघ्या 22 चेंडूत 42 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करण्यास पाचारण केले. दुखापतीमुळे एरोन फिंच या सामन्यात खेळू शकला नाही त्याच्या जागी विकेट किपर फलंदाज मॅथ्यू वेडने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. कर्णधार मॅथ्यू वेडने सलामीला येत आपल्या फलंदाजीची झलख दाखवत 32 चेंडूत 58 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर षटकांत 196 धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. 3 t20 सामनाच्या मालिकेतला तिसरा टी-20 सामना 8 डिसेंबरला याच मैदानावर खेवण्यात येणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.