प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार,काय आहे concussion नियम? वाचा सविस्तर!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मधला पहिला t20 सामना केंब्रिज मैदानावर काल खेळविण्यात आला. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव करत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. क्रिकेटमध्ये कधीही कोणीही सामना जिंकू शकतो. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अनिश्चिततेच्या खेळाबरोबर क्रिकेटमध्ये मैदानात,मैदानाच्या बाहेर काही रंजक घटनाही घडताना हल्ली पाहायला मिळतात. दोन दिवसापूर्वी तिसरा एकदिवसीय सामना चालू असताना मैदानाबाहेर स्टेडियममध्ये एका भारतीय तरूणाने अॉस्ट्रेलियाच्या तरुणीला वेडिंग रिंग देत प्रपोज केल्याची घटना घडली होती. अशीच एक रंजक घटना काल मैदानावरही घडल्याचे पाहिला मिळाले.

काल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळलेल्या सामन्यात युजवेद्र चहल अंतिम अकरामध्ये नसूनही त्याला मॅम ऑफ द मॅच अवार्ड मिळाल्याचा अजब प्रकार घडला आहे.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अंतिम षटकांमध्ये रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत, 23 चेंडूत 44 धावांची ताबडतोब खेळी केली. जडेजाच्या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया समोर 165 धावांचे आव्हान ठेवले. मात्र ही खेळी करत असताना,बांऊसर चेंडू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटला घेऊन जोरात आदळला. या घटनेनंतर डॉक्टर्स मैदानात आले. प्राथमिक उपचार केले. आणि रवींद्र जडेजा पुन्हा खेळण्यासाठी तयार झाला.

रविंद्र जडेजा पुन्हा खेळण्यासाठी तयार झाला मात्र, concussion मुळे बॉटिंग केल्यानंतर तो पुन्हा मैदानात येऊ शकला नाही. आणि त्याच्या जागी लेग स्पिनर युजवेंद्र चहलला या सामन्यात संधी मिळाली. युजवेंद्र चहलनेही या संधीचा पुरेपूर फायदा उठवत, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. आपल्या चार षटकांत चहलने अवघ्या 25 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. 20 षटकात ऑस्ट्रेलिया 7बाद 150 धावांपर्यंत मजल मारू शकला.

काय आहे concussion नियम?

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज फिलिप ह्यूजेस यांच्या डोक्याला बाउन्सर चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर,आयसीसीने याविषयी एक नियम तयार केला. जर फलंदाजी करताना एखादीच्या डोक्याला चेंडू जोरात आदळला,तर त्याच्या जागी बदली खेळाडू घेता येतो. मात्र बदली असणारा खेळाडू हा concussion असणाऱ्या खेळाडू प्रमाणेच रोल निभावणारा खेळाडू असायला हवा. अशा प्रकारचा एक नियम आयसीसीने तयार केला. हा नियम फक्त फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागल्यावरच लागू होतो,असं नाही. तर मैदानावरील कोणत्याही खेळाडूच्या डोक्याला मार लागल्यानंतर हा नियम लागू होतो.

आयसीसीने तयार केलेल्या या नियमाविषयी काही क्रिकेट तज्ञांनी कौतुकही केले आहे. मात्र काहींनी याविषयी टिकाही केल्याचे दिसून आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.