व्होडाफोन व आयडिया चे हे प्लॅन महागले. वाचा सविस्तर
2016 साली मार्केटमध्ये जेव्हा जिओ या टेलिकॉम कंपनीने भारतीय मार्केटमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेल या कंपन्या आर्थिक डब घाईला आल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून व्होडाफोन व आयडिया या दोन कंपन्या एकत्र आल्या. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या वापरकर्त्यांना झटका दिला आहे. त्याचे कारण म्हणजे कंपनीचे दोन लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आता महाग झाले आहेत. कंपनीच्या 598 आणि 749 या दोन्ही पोस्टपेड प्लॅनसाठी आता वापरकर्त्यांना 50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. म्हणजे 598 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 649 रुपये, आणि 749 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 799 रुपये मोजावे लागणार आहेत. ही अधिकची रक्कम वापरकर्त्यांना कंपनीला द्यावी लागणार आहे. हे दोन्ही प्लॅन कंपनीच्या RED फॅमिली प्लॅनचा हिस्सा आहेत. व्होडाफोन व आयडिया (VI) चे 649 व 799 ची वैशिष्टे खालीलप्रमाणे. जर तुम्ही 649 रुपयांचां प्लॅन घेत असाल तर तुम्हाला सर्व नेटवर्कवरती अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. त्याचसोबत महिन्याला एकूण 80 जीबी डेटा देखील मिळणार आहे आणि एकूण 100 एसएमएसची सुविधा मिळते. महत्वाचे म्हणजे या प्लॅनअंतर्गत तुम्ही दोन कनेक्शन वापरु शकता म्हणजे 80 जीबी डेटापैकी 50 जीबी डेटा मुख्य युजरला आणि उर्वरीत 30जीबी डेटा अन्य युजरला मिळतो. तर, 799 रुपयांच्या असणाऱ्या प्लॅनमध्ये एकूण 120 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनमार्फत तुम्ही तीन कनेक्शन वापरू शकता. 120 जीबी डेटापैकी 60जीबी इंटरनेट डेटा मुख्य असणाऱ्या युजरला आणि अन्य दोन युजरसाठी 30-30जीबी वापरता येतो. तसेच वरील दोन्ही प्लॅनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या अॅमेझॉन प्राइम साठी एक वर्ष, झी-5 आणि Vi मूव्हीज अँड टीव्हीचं फ्री सब्सक्रिप्शन देखील तुम्हाला मिळेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.