बारामती येथे अजित पवारांच्या शेजाऱ्यांनी केली होती आत्महत्या, आरोपींना जामीन मंजूर
बारामती शहरातील उद्योजक प्रीतम शहा लेंगरेकर या उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणी बारामतीमधील काही राजकीय लोकांसोबत एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैशावरून सतत मानसिक त्रास व बंगला नावावर करण्यासाठी सतत होत असलेला मानसिक त्रास यामुळे आत्महत्या करत असल्याचे प्रीतम शहा लेंगरेकर यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिले होते. त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी जयसिंग उर्फ बबलू काटे देशमुख (विद्यमान नगरसेवक, बारामती नगरपालिका, जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी, प्रवीण दत्तात्रय गालिऺदे, सुनिल उर्फ सनी आवाळे यांना अटक करण्यात आली होती. नंतर विकास धनके हे पोलिसांना शरण आले होते. या अगोदर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व सत्र न्यायाधीश यांनी वरील सर्वांचा जमीन अर्ज फेटाळून लावला होता.
मात्र आज न्यायालयाने आज जमीन मंजूर केला. आता आरोपींकडे कोणताही तपास उरला नसल्याने व पैशांची देवाणघेवाण झाली होती. याला सावकारी म्हणताच येणार नाही. या सर्व मुद्यांवर सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या वयक्तिक जातमुचलक्यावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वरील आरोपींना १९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. सुरुवातीला पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले होते. आरोपींच्या वतीने डी. डी शिंदे, सचिन वाघ, राजेंद्र काळे यांनी बाजू मांडली.
.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.