कुली नंबर१ चा ट्रेलर प्रदर्शित; काय आहे चित्रपटात? वाचा सविस्तर!
डेव्हिड धवन दिग्दर्शित असणाऱ्या बहुचर्चित ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा टेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १९९५मध्ये आलेल्या कुली नंबर वनचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून भन्नाट प्रतिसाद मिळाला असून,काही तासातच पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.
1995 मध्ये आलेल्या कुली नंबर वन चित्रपटामध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी साकारलेल्या मुख्य भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. करिष्मा आणि गोविंदा या दोघांच्या केमिस्ट्रीचं आजही कौतुक केले जाते. या दोघांप्रमाणे वरून धवन आणि सारा अली खान यांची देखील केमिस्ट्री उत्तम जमल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.
ट्रेलरचा विचार केला तर,डेविड धवन दिग्दर्शित कुली नंबर वन हा चित्रपट कॉमेडी,रोमान्स यांनी परिपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. ‘कुली नंबर वन’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आलेली वरून धवन आणि सारा अली खान यांच्या जोडीची केमिस्ट्री उत्तम जमल्याचे दिसून येत आहे. दोघांचा रोमान्स आणि कॉमेडीचे टाईमिंग कमालीचे जुळल्याचे ट्रेलरमध्ये पाहिला मिळत आहे. ‘हुस्न है सुहाना’ या गाण्याची जबरदस्त झलकही या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दिसून येत आहे.
परेश रावल यांनी सारा अली खानच्या वडिलांची भूमिका केल्याचे दिसून येत आहे. आपल्या मुलीचं भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीबरोबर लग्न व्हावं अशी इच्छा बाळगून असणाऱ्या,परेश रावलला वरून धवन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कसं उल्लु बनवलं?एकंदरीत अशा प्रकारची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
वरून धवन या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसून येत आहे. एक म्हणजे रेल्वे स्टेशनवर तो करत असलेल्या कुलीचं काम आणि दुसरी म्हणजे तो भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहे. कॉमेडी किंग जॉनी लिव्हरने या चित्रपटात इन्स्पेक्टरचे काम केले असून तो वरून धवनचा या चित्रपटात पर्दाफाश करणार असल्याचे या ट्रेलरमधून दिसत आहे. त्याचबरोबर सारा अली खानच्या मामाची भुमिका राजपाल यादव यांनी साकारली आहे.
हा चित्रपट ख्रिसमसला म्हणजेच 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमान्स,कॉमेडी यांनी परिपूर्ण असणाऱ्या या चित्रपटात स्टार कास्टच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना ख्रिसमसला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात वरून सारा अली खान यांच्या मुख्य भूमिकेसह,परेश रावल,राजपाल यादव,जॉनी लिव्हर,जावेद जाफरी,साहिल वैद्य,शिखा तलसानिया,विकास वर्मा,अनिल धवन,मनोज जोशी,भारती आचरेकर, यांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम