राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; शरद पवार यांनी घेतली भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर येथील आमदार भारत भालके हे पुण्यामधील रुबी हॉल रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार भालके यांची भेट घेतली.
शरद पवार यांनी भालके यांची भेटी घेतल्यानंतर शरद पवार यांना भालके यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, त्यांच्या प्रकृती बाबत डॉक्टरांना विचारा असे शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले. आमदार भारत भालके यांच्याबाबत रुबी हॉल हॉस्पिटल चे संचालक डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, “आमदार भारत भालके यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तसेच त्यांना पोस्ट कोविडमुळे खूप त्रास होत आहे. त्यावर उपचार सुरू असून त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे. तर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. आमची टीम लक्ष ठेऊन आहे” असंही डॉक्टरांनी सांगितले.
भारत भालके हे सोलापूरच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. आमदार भारत भालके तिसऱ्यांदा पंढरपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले आहेत. मात्र तिन्ही वेळा ते वेगळ्या पक्षातून आमदार भालके निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारत भालके यांनी काँग्रेस ला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये जाणार अशा देखील चर्चा रंगल्या होत्या.20190 च्या विधानसभा निवडणुकीमध्येब भारत भालके यांनी तिसऱ्यांदा आमदार होवून विजयाची हॅटट्रिक केली. ऑक्टोबर महिन्यामध्ये आमदार भारत भालके यांची कोरोंना चाचणी पोझिटिव आली होती. उपचारानंतर भालके यांना घरी सोडण्यात आलं होतं. मात्र गेल्या आठवड्यापासून आमदार भालके यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यानंतर आमदार भारत भालके यांना पुणे येथील रुबी रुग्णालयामध्ये भर्ती करण्यात आले होते. भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.