कपिल ड्रग्स प्रकरणात तू देखील पकडला जाशील; कपिल काय म्हणाला?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून बॉलिवूडमधील अनेक चेहरे ड्रेस प्रकरणात समोर आले. महाराष्ट्रासह देशाला त्यावेळी बॉलिवूडला लागलेली ड्रग्स ची कीड पाहण्यास मिळाली.केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कॉमेडियन भारती सिंह हच्या घरी छापा टाकला होता तेव्हा भारती सिंहच्या घरात  ड्रग्स हाती लागले होते. केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने  तिला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान भारतीने आपण ड्रग्स चे व्यसन करत असल्याची माहिती स्वतः दिली. 

विनोदाच्या दुनियेत भारतीचे नाव चांगलेच चर्चेत असते. भारती ही नेहमी विविध कॉमेडी शो मध्ये झळकत असते. तिने कॉमेडियन म्हणून आपली छाप उमटवली आहे. मात्र तिच्या या वागण्यामुळे भविष्यात तिला लोक किती प्रतिसाद देतील हे पहावे लागेल. भारतीने आपण व तिचा पती हर्ष ड्रग्स चे सेवन करत असल्याचे मान्य केले आहे.

या प्रकरणामध्ये  ट्रोलर्सनी कपिल शर्माला देखील ओढले आहे. तेव्हा  कपिल देखील शांत बसला नाही. त्याने सुध्दा ट्रोलर्सला सुनावले आहे. परंतु त्यामुळे कपिल पुन्हा ट्रोल झाला आहे. कपिल म्हणाला होता, पहिले तुझ्या मापाचे शर्ट शिवून घे.
‘भारतीची काय आवस्था झाली? जो पर्यंत पकडली गेली नाही तो पर्यंत ड्रग्ज घेत नव्हती. बहुतेक असेच काहीसे तुझ्यासोबत होणार आहे. जोपर्यंत पकडला जात नाही…’ असे   ट्विट एका  ट्रोलरने केले होते.

ड्रग्स प्रकरणाच्या  चौकशीमध्ये  भारती आणि तिचा पती हर्ष  अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती  दिल्यानंतर  केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने   गुन्हा दाखल करून भारती व हर्षला अटक करण्यात आली होती.  भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.