‘जपा’ ‘शपा’ ‘उठा’ असं मी म्हटलं तर चालेल का? असं कोण आणि कोणाला म्हणाले? वाचा सविस्तर!
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘महाराष्ट्राच्या राजकारणात’ कमालीचे उलटफेर पाहिला मिळाले. ‘महाविकास आघाडी सरकार’ स्थापन झाल्यापासून भाजपाने या सरकारवर पहिल्या दिवसापासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली. सरकारवर टीका करण्याची एकही संधी भाजची नेतेमंडळी सोडताना दिसले नाहीत. एकमेकांवर टीका करताना या मंडळींनी वैयक्तिक पातळीवरही टीका करण्यास सुरुवात केली. यामध्ये या मंडळींनी एकमेकांच्या नावातील ‘शॉर्टफॉर्मही काढायला सुरुवात केली.
काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आणि महाविकासआघाडी सरकार मधील नेत्यांमध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहिला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते खूप नाराज झाले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शरद पवार यांच्याविषयी बोलण्याची तुमची लायकी नाही, असा घणाघात केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, फडणवीसांना ‘तरबुजा’ मला ‘चंपा’ म्हटलेल चालतं. मात्र मी टीका केली तर चालत नाही, असा पलटवार केला होता.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्ही फडणवीसांना ‘टरबूजा’ कधीच म्हटलं नाही. चंपा हा तुमच्या नावाचा शॉर्टफॉर्म असल्याने आम्ही तसं म्हटलं,यात काहीच गैर नाही. याविषयी त्यांनी राग मानून घेऊ नये,असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना,चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म शोधत टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी जर शरद पवार यांना ‘शप’ जयंत पाटलांना ‘जपा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘उठा’ असं म्हटलं तर ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात बसणार आहे का? अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी,शेवटी ‘हे’ सरकार अंतर्गत कलहातूनच कोसळणार असल्याने आम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही असंही म्हटलं.
चंद्रकांत पाटील यांनी या तीन बड्या नेत्यांवर केलेल्या खोचक टीकेनंतर पुन्हा एकदा हा विषय येणाऱ्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम