विद्या बालनची बहीण आहे तिच्या पेक्षा हॉट आणि सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार एकमेकांचे नातेवाईक आहेत. याविषयी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक अभिनेत्रींच्या बहिणी,अनेक अभिनेत्यांचे भाऊ बॉलीवूडमध्ये आपले करिअर करताना धडपडताना दिसतात. काहीजण यशस्वी झाले काही जण अपयशी झाले. यामध्ये करिष्मा कपूरची बहीण करीना, प्रियंका चोपडाची बहिण परिणीती चोपडा,अशा अनेक स्टार कलाकारांचे नातेवाईक, बहिणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाले. परंतु असे अनेक स्टार कलाकार आहेत,त्यांचे नातेवाईक फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी अशी ओळख निर्माण करू शकले नाहीत,किंवा यशस्वी होउ शकले नाहीत. त्यातीलच एक नाव म्हणजे विद्या बालन यांची बहीण, प्रियामणी होय.
बॉलीवूडमधील प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये विद्या बालन हीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. विद्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर छाप उमटवली. विद्याने अनेक चित्रपटांमधून आपला जलवा प्रेक्षकांना दाखवला. विद्या बालनचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिटही झाले आहेत. विद्याचा the dirty picture हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर घेतला होता. या चित्रपटानंतर ‘विद्या’ लाखो चाहत्यांच्या मनात आपलं नाव करण्यात यशस्वी झाली होती. तेव्हापासून तिला डर्टी गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मात्र विद्या बालनच्या बहिणीबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे.

प्रियामणी हे विद्या बालनच्या बहिणीचे नाव असून फिल्म इंडस्ट्रीमध्ये अध्याप ती फारश यश मिळवू शकली नाही
प्रियामणी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. अभिनेत्री प्रियामणी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. विद्या बालन आणि प्रियामणी या दोघी सख्या बहिणी नाहीत. विद्या बालन व प्रियामणी या चुलत बहिणी आहेत. याबाबत विद्या बालनने स्वतः खुलासा केला आहे.
प्रियामणीने एका तेलगू चित्रपटामधून आपल्या करीयर ला सुरुवात केली होती. अभिनय क्षेत्रातील तिची सुरुवात खराब झाली. मात्र आज तिने तिचे यश बऱ्याच उंचीवर जाऊन पोहोचले आहे . त्यानंतर तिने तामिळ,कन्नड, आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
प्रियामणीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. प्रियामणीने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये अनेक टॉपच्या अभिनेत्यासोबत काम केले आहे. प्रियामननीने शाहरुख खान आणि दिपीका पादुकोनच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटामध्ये आयटेम साँग केले होते. प्रियामणीने बॉलिवूडमध्ये काम केले असलं तरी तिला फारसं यश मिळालं नाही. तिने मनोज वाजपेयी सोबत केलेल्या ‘फॅमिली मॅन’ वेबसिरीजमध्ये तीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.