राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता

0

करोनाचा वाढते संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार  विचार करीत आहे. मुख्यमंत्री  ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार पुन्हा काही निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस  वाढत चालली आहे. सध्या कोरॉना ची दुसरी लाट येण्याची शक्यता  असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी खुली करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये  असलेली गर्दी,समुद्र चौपाटय़ा, किनारे व  पर्यटनस्थळी, होत असलेली गर्दी यामुळे करोना प्रसार वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे.

शाळा- कॉलेजमध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी काही उपाययोजना करणे, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी  मुक्त वावर नियंत्रित करणे,  लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मास्क न वापरणाऱ्यांना  अधिक दंड आकारणी करणे, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि  अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा संक्रमण रोखण्यासाठी जोरदार तयारी केली  असून, संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. मुंबई महानरपालिकेने यावेळी संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी आपली कंबर कसली आहे.

कोरोनाचा सर्वात मोठा फटका मुंबई शहराला बसला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानरपालिकेतर्फे तयारी सुरू आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी मुंबईत १,१३५ रुग्णांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे बाध , तर १९ जणांचा कारोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनयझेशन ने दिली असल्यामुळे ही शक्यता  लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविले आहे. मंडई, बाजारपेठांमधील विक्रेते, फेरीवाले, परप्रांतातून वा महाराष्ट्राच्या अन्य भागांतून येणाऱ्या लोकांच्या देखील  चाचण्या करण्याचाही निर्णय महानगर पालिकेतर्फे घेण्यात आला आहे. आतापर्यंत १७ लाख ७३ हजार ९८९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

खालील लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा

https://chat.whatsapp.com/EVrfGKdyVHYLecZerqgpNv

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.