रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी यांनी केला फोन…
आपल्या गंमतशीर कवितांमुळे सतत चर्चेत असणारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. रामदास आठवले यांना कारोणाची कोणतीही लक्षणे (Symptoms) आढळली नव्हती . मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी (प्रायव्हेट) रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय रामदास आठवले यांनी घेतला होता.
काही दिवसांमध्ये आठवले यांनी करोनावर मात केली. त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रूग्णालयामधून रविवारी, ८ नोव्हेंबरला डिस्चार्जदेखील मिळाला. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामदास आठवले यांना फोन केला. मोदी यांनी आठवले यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.
आठवले यांनी याबाबत स्वत: त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून याबाबतची माहिती दिली. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फोन करून माझ्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.कोरोना बाधा झाल्यानंतर 12 दिवस उपचार घेऊन आता तब्येत चांगली झाल्याची त्यांना माहिती दिली.माझी तब्येत अधिक चांगली व्हावी यासाठी पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे”, असे ट्विट करून त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील रामदास आठवले यांना त्यांच्याच शैलीत शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्याच आठवले यांच्या शैलीत त्यांना कविता तयार करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या ह्या शुभेच्छा मात्र सर्वत्र चर्चेत होत्या. देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. त्यांचा ‘गो कारोणा गो’ चा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. मात्र ‘गो कोरोना’चा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते १२ दिवसांनी घरी परतले
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम