पदवीधर निवडणूक; माळशिरस तालुक्यात किती पदवीधर मतदार आहेत?आणि मतदान केंद्रे किती आहेत? जाणून घ्या,एका क्लिकवर!

0

पदवीधर मतदार निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुक प्रचाराचे वारेही जोरात वाहू लागले आहे.

पुणे पदवीधर मतदार निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड हे रिंगणात उतरले आहेत. तर त्यांना भाजपच्या संग्राम देशमुख यांचे कडवे आव्हान असणार आहे.

पदवीधर मतदार संघाचे मतदान एक तारखेला होणार आहे. एक तारखेला होणाऱ्या मतदान संबंधी माळशिरस तालुक्याची, मतदानाची पूर्वतयारी झाली असल्याची माहिती प्रांत अधिकारी शमा पवार यांनी दिली आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये एकूण 6 हजार 547 पदवीधर मतदार आहेत. यामध्ये 5 हजार 111 पदवीधर पुरुष तर 1हजार 436 पदवीधर महिलांचा समावेश आहे.

माळशिरस तालुक्यातील पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी तालुक्याच्या विविध ठिकाणी एकूण 13 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. माळशिरस तालुक्यातील पदवीधर मतदारांना आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. अशी माहिती प्रांत अधिकारी,अकलूज शमा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

माळशिरसमध्ये-2,अकलुजमध्ये-4 दहिगाव-1,नातेपुते-2, महाळुंग-1, वेळापूर-2 आणि पिलीव-1, अशी मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही शमा पवार यांनी सांगितलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.