अजित पवारांच्या हस्ते होणार महापूजा; वारकऱ्यांना प्रवेश नाहीच!
महाविकास आघाडी सरकारने पाडव्यापासून धार्मिक स्थळं, मंदिरं उघडण्यास परवानगी दिली होती. धार्मिक स्थळ मंदिर उघडल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेताना दिसून आले होते.
प्रार्थनास्थळ,धार्मिक स्थळ,मंदिरं उघडण्यात आली असली तरी, कार्तिकीवारी निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. २७ तारखेला कार्तिकी आहे. आषाढी वारी नंतर कार्तिकी हा वारकऱ्यांसाठीचा खूप मोठा सोहळा समजला जातो.
२६ तारखेला कार्तिकी असल्यामुळे 24 तारखेपासून पंढरपूर आणि पंढरपुरातील आसपासच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
कोरोणामुळे पहिल्यांदा आषाढी वारी आणि नंतर कार्तिकी अशा दोन्ही वाऱ्यांना पांडुरंगाचा वारकरी मुकला असला तरी तो समजदार आहे. समाजाचं हित तो जाणतो. त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाचे देखील तो पालन करेल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्तिकीवारी निमित्त पांडुरंगाची पूजा करणार आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पालख्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात येणाऱ्या बसेस सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम