फुगलेल्या निकालांमुळे परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय या विद्याीठाने घेतला

0



नुकत्याच मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले.

काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑनलाईन परीक्षेत काहीतरी कमतरता राहिल्याची जाणीव आत्ता मुंबई विद्यापीठाला झाली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेप्रमाने आता मुंबई विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक वर्षांतील सेमीस्टर परीक्षा देखील ऑनलाइन होणार आहेत. मात्र, निकालातील गुणवाढीमुळे आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांची परीक्षा MCQ आणि विश्लेषणात्मक(Descriptive) अशा दोन्ही स्वरूपांत होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या या परीक्षा चालू डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान होणार आहेत.

गेल्या शैक्षणिक वर्षांतील बहुचर्चित अंतिम परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुटच सूट मिळाली. घरी बसून परीक्षा देण्याचा पर्याय, MCQ प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून महाविद्यालयांकडून पुरवण्यात आलेले प्रश्नसंच यामुळे अंतिम वर्षांचे निकाल २५ ते ३० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणत वाढले. शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठाने सेमीस्टर परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. सेमीस्टर परीक्षा ऑनलाइनच होणार असली तरी त्याच्यामध्ये बदल होणार आहे. प्रश्नपत्रिका ही फक्त बहुपर्यायी (MCQ) प्रकारची असणार नाही, तर त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक प्रकारचे असणार आहेत. प्रश्नांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

कॉमर्स, इंजिनीअरिंग, फार्मसी, वास्तुकला, MCA, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम यासाठी बहुपर्यायी(MCQ) आणि विश्लेषणात्मक प्रश्न (Descriptive) अशा दोन्ही स्वरूपांत परीक्षा होणार आहे. मात्र जे पारंपरिक अभ्यासक्रम आहेत त्यांची परीक्षा मात्र बहुपर्यायीच राहणार असून प्रश्नांची संख्या वाढणार आहे. परीक्षेचे नियोजन मात्र कॉलेजकडे देण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा वेळापत्रक ह्या सर्व गोष्टींचे अधिकार हे कॉलेज प्रशासनाला देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परीक्षांचे नियोजनही महाविद्यालयांकडे सोपवण्यात आले आहे. विद्यापीठाने ढोबळ आराखडा दिला असून प्रश्नपत्रिका काढणे, वेळापत्रक तयार करणे हे सर्व महाविद्यालयांच्या स्तरावर करण्यात येणार आहे. परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. परीक्षेचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून, शिक्षकांनी महाविद्यालयात बसूनच मूल्यांकन करावे अशी सूचनाही विद्यापीठाने दिली आहे.

२४ डिसेंबर पर्यंत अंतर्गत मूल्यमापन करून त्याचे गुण विद्यापीठात सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.प्रॅक्टिकल परीक्षा १० डिसेंबरला सुरू होत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.