उत्तर प्रदेशमध्ये हत्यांचं सत्र सुरूच!

0

गुन्हेगारी आणि उत्तर प्रदेश हे समीकरण काही नवीन नाही. मात्र,गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार अत्याचाराच्या घटना वारंवार पाहायला मिळाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीची निर्घुन हत्या केल्याची घटना कानपूरच्या घाटमपुरमधील भदरस गावामध्ये घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनीच प्रयागराजमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणाची गळा कापून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

आज पुन्हा एकदा फतेहपुर जिल्ह्यातील अथसर गावामध्ये दोन दलीत बहिणींची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. या दोन्ही बहिणींचा मृतदेह तलावात सापडल्याचे समजते. हत्या झालेल्या दोन्ही बहिणींचे वय १२आणि ८ वर्षं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही मुली सरपन आणण्यासाठी जंगलामध्ये गेल्या होत्या. मात्र त्या दोघी रात्र झाली तरी घरी परतला नसल्यामुळे,ग्रामस्थांनी त्यांना जंगलामध्ये शोधण्यास सुरुवात केली. ग्रामस्थ शोध घेत असताना त्यांना एका तलावात या दोन्ही मुलींचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असल्याची माहिती आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.