सहा वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या; नरबळी दिल्याचा संशय

0

कानपुरच्या घाटमपुरमधील भदरस गावामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीची निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

हत्त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, हत्या एवढी तीव्र आहे, की हत्या करून मुलीचा शरीरातील आतील भाग गायब केल्याचा अजब प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी हजारोच्या संख्येने स्थानिक उपस्थित राहून या घटनेचा निषेध करत आहेत. त्याचबरोबर जोपर्यंत आरोपींचा छडा लागत नाही,तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.

सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह काली मंदिराच्या जवळ आढळल्याने अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. त्याचबरोबर हत्या झालेल्या मुलीच्या हाताला आणि पायाला लाल रंग लागल्याने तंत्र मंत्र, नरबली या अंधश्रद्धेमुळे झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी अनेक पोलिस स्टेशनच्या फौजफाटा तैनात करण्यात आलेल्या आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. ही हत्या कशामुळे झाली हे अद्याप काही स्पष्ट झाले नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.