‘लागीर झालं जी’ मधून घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेत्रीचं कर्करोगाने निधन!
‘झी मराठी’ या वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने जवळपास सगळ्याच पात्रांना अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती. या मालिकेने खूप कमी काळात लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.

‘जीजी’ नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ‘कमल ठोके यांनीही आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मने जिंकत त्या घराघरात पोहोचल्या. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके ह्या यापुढे अभिनय करताना प्रेक्षकांना दिसणार नाहीत.
७२ वर्षीय कमल ठोके यांचे कर्करोग आजाराने काल संध्याकाळी बंगलोर येथे निधन झाले. ‘कमल ठोके’ यांचा अंत्यविधी कराडमधील कमलेश्वर मंदिर शेजारच्या स्मशानभूमीमध्ये सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती आहे.
कमल ठोके ह्या पेशाने शिक्षिका होत्या. शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांनी आपला अभिनयही जोपासला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. कुंकू झालं वैरी,सक्खा भाऊ पक्का वैरी! अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम