का होत आहेत खासदार अमोल कोल्हे ट्रोल? वाचा सविस्तर..
सध्या एका फोटोवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार
व स्वराज्यरक्षक संभाजीराजे या मालिकेतून घरोघरी पोहोचलेले अमोल कोल्हे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतल्या मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वतः खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी ट्विट देखील केले आहे. खासदार अमोल कोल्हे व बाबासाहेब पुरंदरे यांच्या झालेल्या भेटीमुळे अमोल कोल्हे हे प्रचंड ट्रोल होत आहेत.
खालील प्रमाणे अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे. आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दिवाळीनिमित्त भेट घेऊन आशिर्वाद घेतले.यानिमित्ताने शिवकाळाचा अमूल्य ओघवता खजिना पुन्हा अनुभवता आला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित शिवसंस्कार सृष्टी या प्रकल्पाची माहिती घेऊन या संकल्पनेचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्वराज्यजननी जिजामाता मालिका,आगामी चित्रपट यावर मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याप्रसंगी ‘शिवगंध’ पुस्तक त्यांना दिले आणि त्यांच्याकडून ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ ही दिवाळी पुस्तक भेट मिळाली. वयाचे शतक साजरे करणाऱ्या एका आदरणीय शिवप्रेमीच्या सहवासातील हा अविस्मरणीय दिवाळसन!
त्यांच्या पोस्ट वरती आलेल्या कमेंट
१) अलीकडे अमोल कोल्हे हे नेता म्हणून जरी नाव लौकिकाला जरी असले तरी ते अभिनेता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो अन्य राज्यांच्या नावावर मनोरंजक, काल्पनिक कथा ह्यावर नवीन काही तरी सिनेमा, सिरीयल सुरु करायची असेल. त्यातून प्रसिद्धी, पैसा मिळतो.
महापुरुषांच्या चारित्र्याचे विकृती करणाऱ्या लोकांचे मुके घेतले तरी अश्या तद्दन फालतू लोकांना चालते.
अमोल कोल्हे उद्या अजून काही तरी कारण सांगून पलटी मारतील.
२) काम सरो वैद्य मरो…
हि संस्कृती आहे कोल्हेची…
३) साहेब ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून, जिजाऊ ची बदनामी करनार्यंचे आशीर्वाद कशासाठी..?
४)#शिवद्रोही ची भेटी मागचं प्रयोजन काय
त्यांनी सांगितलेल्या इतिहासावर मालिका,चित्रपट बनवू नका म्हणजे मिळवलं????
५) कोल्हे साहेब तुम्ही आज खरोखर चुकलात..तुमचा आदर्श आमच्यापुढे वेगळा आहे..आणि ह्या पुरंदरचा वेगळा..तुम्ही चुकलात…बगा पोस्ट delet करता आली तर..नाही तर फार ट्रोल व्हाल तुम्ही की जे आम्ही सहन करू शकत नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम