महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन कमळ, भाजपची सत्ता येणार?

0

बिहारमध्ये NDA ने १२५ जागा जिंकून सत्ता

जाहिराती साठी संपर्क करा. 9373403078 WhatsApp only

मिळवल्यानंतर राणे यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ ला सुरुवात होणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. ऑपरेशन कमळ करून महाविकास आघाडीची सत्ता खेचायची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील राणे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणतात, “राणे म्हणतात की आम्ही महाराष्ट्र राज्यातील सरकार खाली ओढणार आहोत. दर तीन महिन्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय यांचे सैन्य यांच्यासोबत रहात नाही.हा खरा प्रॉब्लेम आहे. आपलं सरकार येणार आहे येणार आहे असे सांगत एक वर्ष झाले. चार वर्ष कशी जातील हे तुम्हाला कळणार नाही.”

कोरोनाच्या काळात मार्चमध्ये मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन कमळ यशस्वी केले. काँग्रेसची सत्ता उलथवून लावली. काँग्रेसची सत्ता उलथवून लावत शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील स्थिती मात्र वेगळी आहे. मध्येप्रदेशमधोल २२ आमदारांनी काँग्रेस च्या सदस्यत्वाचा राजीनामा देत बंडखोरी केली होती. त्यामुळे कमलनाथ त्यामुळे कमलनाथ यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रामध्ये भाजपकडे १०५ जागा आहेत आणि बहुमतासाठी १४४ जागा लागतात त्यामुळे  भाजपाला बहुमतासाठी एकूण ३९ आमदारांची गरज असेल आणि एकाच वेळी विकाविकास आघाडीमधून एवढ्या संख्येने आमदार फोडणे कठीण आहे.

या आधी देखील नारायण राणे हे ऑपरेशन कमळ बद्दल बोलले आहेत. मात्र एकही  डेड लाईन खरी ठरली नाही. महाविद्यालय आघाडीचे सरकार एकमेकांमधील मतभेदांमुळे संपेल असे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात. राजकारणात काही गोष्टी सुगावा न लागता होतात परंतु बहुमताचे अंतर पाहता ऑपरेशन कमळ महाराष्ट्र राज्यामध्ये शक्य नाही.

खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/JtkF5Gty52NJmGfcl5NBCT

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.