ही तर खरी सुरुवात; अर्णव गोस्वामी याचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब
गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. अर्णब गोस्वामी याच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णबला जामीन मंजूर केला.
अर्णब गोस्वामी यांच्यासोबत इतर दोन आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने प्रत्येकी ५०००० रुपयाच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी याने पुन्हा आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असे अर्णव म्हणाला.
पुढे अर्णव म्हणाला “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,”. अर्णब ने आपण सर्व भाषेत आपले रिपब्लिक भारत चे चॅनल ची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असंही अर्णव यांने उध्दव ठाकरेंवर आरोप करताना म्हटले आहे .
अर्णब गोस्वामी यांना जामीन दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टिकास्त्र डागले. देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्ताने अर्णब गोस्वामी याचे समर्थन केले आहे.
खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये add व्हा.*
https://chat.whatsapp.com/GZ6mV0GxjBd2yR0a7Wn4c
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम