अडचणीच्या काळात आम्हाला सोडून गेलेल्यांना अजूनही मंत्रिपद मिळण्याची स्वप्ने पडतात; मंत्री बाळासाहेब थोरात
.
लोकसभा व विधानसभा निवणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व काँग्रेस मधील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पक्षाला रामराम ठोकला व भाजपा मध्ये प्रवेश केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी असणारे विजयसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते यांनी देखील पक्षाला रामराम ठोकळा. त्याचसोबत काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या काँग्रेस या पक्षाला राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला. जयकुमार गोरे हे मान खटाव चे तिसऱ्यांदा आमदार आहेत.
“अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून भाजपा मध्ये गेलेल्या काही लोकांना अजुनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्ने पडतात ” असे विधान बाळासाहेब थोरात यांनी जयकुमार गोरे यांच्या बाबत केले आहे.
सातारा येथील कॉंग्रेस कार्यालयात बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्या हजेरीमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी आपली काँग्रेस बळकट होत चालल्याचे सुध्दा आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमावेळी मात्र त्यांनी माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम