ऐतिहासिक विजयानंतर ‘जो बायडन’ काय म्हणाले?

0

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. संपूर्ण मतमोजणीला तब्बल चार दिवस लागले. मतदान होऊन चार दिवसानंतर डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते ‘जो बिडेन’ यांच्यावर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.

या निवडणुकीत जो बीडेन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर डेमोक्रॅटिक नेते जो बिडेन म्हणाले “मी या देशाचा असा अध्यक्ष बनण्याचं वचन देतो, की जो लोकशाही आणि रिपब्लिकन राज्यांमध्ये कसलेही मतभेद करणार नाही. संपूर्ण देशाकडे एका नजरेने पाहीन. त्याचबरोबर बिडेन यांनी देशाला संघटित करण्याचेही वचन दिले. ते पुढे म्हणाले, झालेल्या जखमा भरून काढण्याची आता वेळ आली आहे. शनिवारी रात्री विजयानंतर राष्ट्राध्यक्ष जो बिडेन एका भाषणात जनतेला संबोधन करत होते.

जो बिडेन यांनी या भाषणाची लिंक आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. या भाषणात त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच देखील तोंडभरून कौतुक केलं.

बीडेन म्हणाले,मी माझ्या कार्यकाळात अमेरिकेचा आत्मा पुन्हा जिवंत करण्यासाठी,देशाचा खऱ्या अर्थाने पाठीचा कणा असणाऱ्या मध्यम वर्गीला पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जगभरात अमेरिकेचा सन्मान वाढवण्यासाठी, देशांतर्गत एकजुटता टिकवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

बीडेन यांनी ट्रम्प समर्थकांविषयी देखील सकारात्मक भाष्य केले. ते म्हणाले, आता आपण एकमेकांवर टीका न करता आपण एकमेकांना संधी दिली पाहिजे. कठोर भाषा आणि राग कमी करण्याची ही वेळ आहे. ही वेळ आपण एकमेकांना बघण्याची आणि ऐकण्याची आहे. बीडेन बोलत असताना उपस्थित जनसमुदाय टाळ्यांचा कडकडाट करताना दिसून येत आहे.

बीडेन यांनी यापूर्वीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. बीडेन यांनी १९८८ आणि २००८ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती,मात्र त्यांना यश आलं नव्हतं. यावेळी अमेरिकेने विक्रमी मतदान करून बीडेन यांना विजयी केलं.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.