डोनाल्ड ट्रम्प पराभवाच्या छायेत!

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणूककडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. निकालाची वेळ आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून आतापर्यंतच्या मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाईडन आघाडीवर आहेत.

बुधवार सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अजूनही मतमोजणी सुरूच आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीचा विचार केला तर, जो बाईडन विजयाच्या जवळ असल्याचे चित्र आहे. जो बाईडन यांना आतापर्यंत 264 मते मिळाली आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते मिळाली आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची वर्णी लागण्यासाठी 270 इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. हा जादुई आकडा गाठण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाईडन यांना आता फक्त 6 मतांची आवश्यकता आहे.

जो बाईडन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट करत आता विजय आपलाच होणार आहे. हा विजय माझा नसून संपूर्ण अमेरिकेचा आहे, अमेरिकेतील लोकांचा आहे, लोकशाहीचा आहे. असं जो बाईडन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.