इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटल्याची तारीख ढकलली पुढे

0

दोन्ही बाजूच्या वकीलांचे युक्तिवाद तयार नसल्याने, प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर) यांच्यावर सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आता 25 नोव्हेंबरला होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्याने  त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात खटला चालू आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा,1994 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,यासंबंधी न्यायालयात खटला सुरू आहे.

*काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज**?*

दोन जानेवारीला मुंबईमधील उरणमध्ये केलेल्या कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराज यांनी,मुलगा होण्याचा एक अजब फॉर्म्युला सांगितला होता. या कीर्तनात त्यांनी म्हटलं होतं,स्त्रीसंग जर सम तारखेला झाला,तर मुलगा होता. आणि विषम तारखेला झाला तर मुलगी होते.‌ त्याचबरोबर त्यांनी स्त्रीसंग जर अशुभ वेळेला झाला तर, होणारी संतती ही रांगडी,बेवडी होत असते,असाही अजब दावा केला होता.

त्यांच्या या कीर्तनातील अजब दाव्यानंतर अहमदनगरच्या प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस बजावली होते. नंतर गुन्हाही दाखल करण्यात आला.

**महिलांचा अपमान करणारी इंदुरीकर महाराजांची काही वाक्ये*

चप्पल कितीही भारी असली तरी, आपण तिला गळ्यात घालतो का? चप्पल पायात शोभती. बायको आहे ती,तीने त्या मापातच राहावं.

पोरीच्या अंगात जितके कपडे कमी,पोरगी तितकी पटकावली पाहिजे.

गोरी बायको करु नये, ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या.

इंदुरीकर महाराजांची महिलांचा अपमान करणारी अशी अनेक वाक्य,आजही सोशल मीडियावर ऐकायला मिळतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.