मोदीजी आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा; राहुल गांधी

0

कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला. भारताच्या अर्थव्यवस्थेलाही या महामारीचा मोठा फटका बसला. केंद्र सरकार आता कोरोना निधी उभारण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स वाढवण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातलं इंडियन एक्सप्रेसने एक वृत्त दिले आहे.

इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात दिलेल्या वृत्ताला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिट्विट करत भाजपावर जोरदार टीका केली आहे.

पेट्रोल आणि डिझेल टॅक्स वाढीच्या संदर्भात राहुल गांधी भाजपवर हल्ला चढवत म्हणाले, प्रधानमंत्रीजी,जनतेला लुटायचं सोडून द्या,आत्मनिर्भर बना,आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा. अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी भाजपवर केली.

अदानी,अंबानी या दोघांना देशाच्या गरीब जनतेचा पैसा मोदी देत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार करतात. मोदी सरकारने सरकारी कंपनी एच ए एलचं राफेलचे कॉन्ट्रॅक्ट काढून अंबानीच्या रिलायंस समूहाला दिलं होत. त्याचबरोबर रेल्वे,विमानतळ अनेक सरकारी मालमत्तेचं खाजगीकरण करून अदानी ग्रुपला देण्याचं कामही मोदी सरकार केलेलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.