राणे कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरे यांचा बेडूक हा शब्द प्रयोग यावर निलेश राणे यांचा पलटवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये आपल्या विरोधकांवरती व भारतीय जनता पार्टी वरती निशाणा साधला. नारायण राणे कुटुंबियांसाठी उद्धव ठाकरे यांनी बेडुक हा शब्दप्रयोग वापरला.यावरती निलेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“जसा एक मुख्यमंत्री बोलला पाहिजे तसे उद्धव ठाकरे बोलत नाहीत व कामही करत नाहीत. ते काल काय बोलत होते, ते त्यांना देखील समजले नसेल. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्री बोलू शकतो, हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिल असेल. नाव न घेता त्यांनी आमच्या कुटुंबियांवर टीका केली. आमचे नाव घेण्याची हिम्मत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. त्यांना माहिती आहे, चिरफाड होईल. मी त्यांना आव्हान केले आहे की, एक ठिकाण द्या , वेळ द्या आणि होऊन जाऊद्या काय ते एकदा. तुम्ही नेहमीच राणेंवर टीका करत असता. तुमच्यात आमचे नाव घेण्याची हिंमत नाही. तुम्ही नेहमी टीका करणार खालच्या पातळीवर जाऊन आमच्या नेत्यांवर टीका करणार,” असे निलेश राणे म्हणाले.
पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले “मुख्यमंत्री हे फक्त आमच्यावर बोलले नाहीत, ते आमच्या पक्षातील नेत्यांवर देखील बोलले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गल्लीतली भाषा वापरली आहे. एका मुख्यमंत्र्याला शोभेल अशी ही भाषा नाही. उद्धव ठाकरे तुम्ही स्वतःला संयमी नेते म्हणता, हा तुमचा संयमी पण आहे का? दुसऱ्याची संस्कृती काढण्याअगोदर ठाकरे कुटुंबाने स्वतःची संस्कृती पहावी. तुम्ही काय आहात हे जर एकदा महाराष्ट्राला कळले तर ढुंगण दाखवायला जागा मिळणार नाही असे राणे म्हणाले.
काल दसरा मेळाव्यामध्ये मध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, “अंगावर याल तर याद राखा”. यावर राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “यांच्या अंगावर कोण जाणार. यांच्यामध्ये धमकच नाही. मी रोज अंगावर जातो परंतु कुठलाही शिवसैनिक मला काही बोलू शकत नाही. कारण ते फक्त कमजोर लोकांच्या अंगावरती जातात. तुम्ही म्हणता अंगावर आला तर फेकून देऊ. किती लोकांना तुम्ही आत्तापर्यंत फेकून दिले? “नशिबाने तुम्ही मुख्यमंत्री झालात” असे राणे म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम