उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उपचार घेण्यासाठी अजित पवार हे ब्रिच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. गेले दोन तीन दिवस अजित पवार हे स्वतः विलगीकरणमध्ये होते. अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती.

आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अजित पवार यांनी स्वतः सांगितले. आपली प्रकृती स्थिर असून, काळजी करण्यासारखे काहीही नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. आपली प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ऍडमिट झालो आहे. राज्यातील नागरिक, समर्थक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अजित पवार यांनी काळजी करू नये असे आव्हान केले आहे. मी थोड्या  विश्रांतीनंतर लवकर बरा होईल असे देखील अजित पवार  म्हणाले.

देशामध्ये कोरणाचे थैमान सुरू झाले तरीही अजित पवार न डगमगता ग्राउंड लेव्हला काम करत आहेत. गेले सहा-सात महिन्यांपासून कोरोणाने देशासह जगभर थैमान घातले आहे. यामध्ये कोरोनाने गरीब-श्रीमंत उच्च-नीच असा कुठलाही भेदभाव केला नाही त्यामुळे अनेक उच्चवर्गीयांना देखील कोरोणाचे बळी पडावे लागले.

नुकताच अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यांनी बारामती इंदापूर व सोलापूर या ठिकाणी जाऊन अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतीची पाहणी केली.
लक्षणे जाणवू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार यांनी स्वतःची कोरोना चाचणी काल केली परंतु ती चाचणी निगेटिव्ह आली. तरीही डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन  व्हायला सांगितले. त्यामुळे अजित पवार घरीच होते ‌. त्यांनी कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र आज यांना दवाखान्या मध्ये दाखल करण्यात आले तेव्हा चाचणी पॉझिटिव आली.

अजित पवार यांना कोणाची लागण झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती. याबाबत पार्थ पवार यांना विचारले असता ही बातमी खोटी असल्याचे पार्थ पवार यांनी नमूद केले. मात्र आज पुन्हा त्यांना दवाखान्यामध्ये भरती केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.