युवराज सिंगने आपल्या एक्स गर्लफ्रेंड च्या बिकिनी फोटोवर कमेंट करत उडवली खिल्ली.

https://www.instagram.com/p/CGuJMR-nKOD/?igshid=hesmqyze7xg0


एकेकाळी युवराज सिंग की गर्लफ्रेंड असणारी किम शर्मा  या दोघांनामधील नात्याबाबत अनेकदा चर्चा झाल्या. ती नेहमीच वेगवेगळे फोटो इंस्टाग्राम वरून शेअर करत असते. मात्र यावेळी तिचा फोटो चर्चेत आला आहे कारण या फोटो वरती भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने किम शर्माच्या पोस्ट वरती  तिची खिल्ली उडवणारी पोस्ट लिहिली. ती या बिकिनी मधील फोटो मध्ये खूप हॉट दिसत आहे.

तिच्या या इंस्टाग्राम फोटोवर युवराजने मजेशीर अंदाजात कमेंट केली आहे. त्याने “गांव बसा नहीं बस्ता लेकर पहुंच गई हैं मैडम” असे म्हणत किम शर्माची खिल्ली उडवली आहे. त्याच्या या कमेंटवर किमने देखील रिप्लाय दिला आहे. तिने ‘इंग्रजी प्लीज’ असे म्हटले आहे.

किम शर्मा ही एक अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी किम शर्मा ही मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंग क्षेत्रात किम शर्मा  प्रसिध्द होती. सध्या तिचे वय 40 आहे.  ‘मोहब्बते’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तिने पुढे अनेक चित्रपटात काम केले परंतू तिला म्हणावे तसे यश मिळालेले नाही .

२००३ पासून किम आणि युवराज सिंग यांच्या प्रेमाच्या बातम्या येऊ लागल्या. जवळजवळ ४ वर्ष त्याच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहिला. नंतरच्या काळात त्यांच्या नात्यामध्ये कटुता येऊ लागली आणि शेवटी २००७ मध्ये ह्या दोघांचा ब्रेक अप झाला. युवराजच्या आईला सून म्हणून किम शर्मा पसंद नव्हती. परंतु एका मुलाखतीमध्ये युवराजने सांगितले की “आमच्यामध्ये काही गैरसमजामुळे झाल्यामुळे आम्ही ब्रेकअप केला.”असे युवराजने सांगितले.

२०१० मध्ये अली पुंजनी सोबत तिने लग्न केले. अली पुंजानी या उद्योजकाचा आधीच झाला होता. त्याला तीन मुले होती तरीही त्याने किम शर्मा सोबत लग्न करण्यासाठी त्याच्या आधीच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला. परंतु त्यांचे लग्न देखील फार काळ टिकले नाही. किम शर्मा आणि अली पूंजानी यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला व २०१७ मध्ये ती पुन्हा भारतामध्ये आली.किम शर्माने नंतर आपल्यापेक्षा ४ वर्ष वयाने लहान असणाऱ्या हर्षवर्धन राणे या कलाकारासोबत डेट करत होती.

क्रिकेटपटू युवराज सिंग व किम शर्मा हे दोघेही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. परंतु असे बोलले जाते की ते दोघे 2007 पासून एकमेकांपासून दूर गेले अर्थात त्यांचा ब्रेकअप झाला व परंतु एक वैशिष्ट म्हणजे ह्या दोघांनी आपले मैत्रीचे नाते मात्र कायम ठेवले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.