जळगावमध्ये खडसे यांचे जंगी स्वागत ,ठीक ठिकाणी बॅनरबाजी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

0

ज्यांनी स्वतःच्या पक्षासाठी आपले सर्वस्व दिले. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण करून देण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभारणीमध्ये मोलाचा वाटा असलेले एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीमध्ये महत्त्वाचा चेहरा मानला जात होते. उत्तर महाराष्ट्र राजकारणामधील किंग मेकर अशी देखील ओळख एकनाथ खडसे यांची आहे.

मात्र खडसे यांनाच आपल्या भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकावा लागला. गेले अनेक दिवसांपासून गोपीनाथ मुंडे यांची पक्षांमध्ये घुसमट होत होती. कधी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्री पद काढून घेण्यात आले होते. त्यानंतरच्या काळामध्ये देखील एकनाथ खडसे यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसे लांब ठेवता येईल हे त्यांच्याच पक्षातील काही नेतेमंडळींनी केले.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खडसे यांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे खडसे यांची नाराजी आणखीनच वाढली. व खडसे यांना आपल्याच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकावा लागला व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. येत्या काळामध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाचा फटका भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाही. कारण खते यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीने इतर मागासवर्गीय चेहरा गमावलेला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे खूप मोठा परिणाम होणार आहे.

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्याचबरोबर खडसे हे सत्ताधारी पक्षांमध्ये गेले असल्यामुळे अनेक आमदार खासदार त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून खडसे जळगावला गेले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. खडसे यांच्या समर्थनार्थ जळगावमध्ये ठिकाणी बॅनरबाजी झालेली पाहायला मिळाली.
जळगाव मध्ये खडसे यांचे जंगी स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.