बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. महागटबंधन आणि एनडीएकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत. भारतीय जनता पार्टीने तर अनेक राज्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींना या प्रचारात उतरले आहे. भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीला खूप महत्त्व दिले असून,जोरदार ताकतही लावली आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री,योगी आदित्यनाथ यांनी देखील बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा घेतल्या. काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
भाजपाने आपल्या घोषणापत्रात जर बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं तर, आम्ही बिहारला मोफत कोरोणा लस देऊ! अशी अजब घोषणा केली आहे. आता या वादात शिवसेनेने उडी घेत भाजपाच्या घोषणापत्रावरचा सामना’च्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेतला आहे.
ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही,त्या त्या राज्याला लस देण्याची तुमची प्राथमिकता नाही का? त्या राज्यांना लस मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. ज्या राज्यात भाजप विचारांची सत्ता नाही त्या राज्यांना कोरोणाची लस मिळणार नाही का? त्या राज्यांनी पुनीतकडून लस मागायची का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला.
बिहारला कोरोनाची लस मिळावी,याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. परंतु बिहार प्रमाणे इतर राज्येही भारतातच आहेत. ती काय पाकिस्तानमध्ये आहेत काय? भाजपाने कोरोनाच्या लसीचे राजकारण करू नये! देशाला आता राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लशीची गरज आहे. अशी जोरदार टीका शिवसेना भाजपावर केली आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम