स्वाभिमानी माणूस राज्यपाल पदावर राहिला नसता; शरद पवार
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं उघडण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे चांगलेच वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले होते. आता पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर असताना, उस्मानाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा हवाला देत राज्यपाल भगतसिंग कोसारी यांचा चांगलाच समाचार घेतला. देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यायी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राविषयी खेद व्यक्त केला. राज्यपाल चांगल्या शब्दांचा वापर करू शकले असते,असे गृहमंत्री म्हणाल्यानंतर कोणताही स्वाभिमानी माणूस अशा संविधानिक पदावर राहिला नसता. असे शरद पवार म्हणाले. त्यांना राजीनामा मागणारे आम्ही कोण आहोत? त्यांना जर आत्मसन्मान असता तर त्यांनी पदाचा केव्हाच राजीनामा दिला असता. असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला आहे.
शरद पवार यांनी या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय भूमिका घेतात?हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी एका वृत्तवाहिनीने राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारले होते. त्यासंदर्भात उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते, राज्यपाल चांगल्या शब्दांचा वापर करू शकले असते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम