IND vs AUS BGT trophy: ..म्हणून भर मैदानात विराट कोहलीने बॉल टेंपरिंगची आठवण करून दिली; कारण जाणून तुम्हीही म्हणाल well done विराट..
IND vs AUS BGT trophy: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर (border gavskar trophy) ऑस्ट्रेलियाने आपले नाव कोरले. भारतासाठी ही मालिका निराशाजनक राहिली. असं असलं तरी ही मालिका चर्चेत मात्र कमालीची राहिली. खासकरून सिडनी कसोटी (Sydney test) सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघामध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला.
विराट कोहली (virat kohli) आपल्या खेळाबरोबर मैदानावरील आक्रमक पवित्र्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. जरी विराट कोहली आपल्या आक्रमक स्वभासाठी ओळखला जात असला तरी, तो एक मर्यादा नेहमी पळत असतो. सिडनी क्रिकेट मैदानावर मात्र विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया मीडिया आणि चाहत्यांच्या टीकेला जसास तसे उत्तर दिले आहे. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचे चाहते सातत्याने बूम करत होते. चाहत्यांबरोबर विराट कोहलीचा Sam Konstas सोबत देखील वाद पाहायला मिळाला.
दुसरीकडे विराट कोहली फलंदाज म्हणून या संपूर्ण मालिकेत अपयशी ठरला. साहजिकच त्यामुळे देखील तो वैतागला होता. आता या सगळ्यांचा राग आणि ऑस्ट्रेलिया चाहते आणि मीडियाला प्रतिउत्तर म्हणून विराट कोहलीने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कैमरन बैनक्रॉफ्टने केलेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाची आठवण करून दिली.
|| WE DON’T CHEAT ||
Virat Kohli reminding Australian crowd that even when we lose we lose with dignity unlike Ausies!!
He was showing his empty pockets to the crowd. King of Cricket 👑 and King of banters too!!#INDvAUS #AUSvIND #ViratKohli𓃵 pic.twitter.com/4EMCpfLZsV
— Sports Entertainment (@sportsEnt15) January 5, 2025
खरंतर 2019 विश्वचषक सामन्यात जेव्हा भारतीय प्रेक्षकांनी चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथला डिवचायला सुरुवात केली होती, तेव्हा विराट कोहली स्वतः पुढे आला होता. आणि त्याने चाहत्यांना शांत करत स्मिथचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी विराट कोहलीला डिवचल्यामुळे विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथ बाद होताच चेंडू छेडछाड प्रकरणाची ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना आठवण करून दिली.
स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर, विराट कोहलीने, कैमरन बैनक्रॉफ्टने ज्या पद्धतीने चेंडूची छेडछाड केली होती, तशीच हुबेहूब नक्कल करत विराट कोहलीने या प्रकरणाची ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना आठवण करून दिली. ऑस्ट्रेलियाचे चाहते विराट कोहलीशी पंगा घेत होते. या सगळ्यांचे तोंड बंद करण्यासाठी विराट कोहलीने आम्ही विकेट घेण्यासाठी चेंडूशी छेडछाड करत नसल्याचा संदेश त्यांना देत तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.
विराट कोहलीने कैमरन बैनक्रॉफ्टच्या केलेल्या नकलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओचे समर्थन करत विराट कोहलीला सपोर्ट केला आहे. तर काहींनी विराट कोहलीवर टीका देखील केली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक आणि मीडियाला अशाच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याच्या आवश्यकता होती. अशा कमेंट देखील सोशल मीडियावर अनेकांनी केल्याचं पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा Yuzvendra chahal dhanashree verma: अखेर चहल धनश्री वर्माचा घटस्फोट; त्या व्यक्तीसाठी चहलला दिला डच्चू..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम