Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अटीत तीन मोठे बदल; आता असा करता येणार अर्ज..

0

Mazi Ladki Bahin Yojana: आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने (Maharashtra government) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) भारतीय जनता पार्टीला (bjp) मोठा फटका बसला. खास करून महाराष्ट्राच्या जनतेने भाजपल सपशेल नाकारण्याचे चित्र पाहायला मिळालं. आणि म्हणूनच लोकांना आकर्षित करण्यासाठी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget sessions) महिलांसाठी विशेष योजनेची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत राज्यातील गरीब महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना रक्कम दिली जाणार आहे. या योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर, 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आले होती. आता मात्र अर्जाच्या मुदतीबरोबर पत्रातेत देखील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

काय बदल करण्यात आले..?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी” या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पूर्वी लाभार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार होता. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांना जुलैपासून १,५०० हजार रुपये महिना मिळणार असल्याची तरतूदही करण्यात आली आहे.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयापुढे महिलांची खूप मोठी गर्दी होत असल्याची जाणीव झाल्यानंतर, आवश्यक कागदपत्रामधून उत्पन्नाचा दाखला वगळण्यात आला. यापूर्वी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता. उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि केसरी रेशन कार्ड चालणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केले आहे.

उत्पन्नाच्या दाखल्याबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी देखील महिलांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. आणि म्हणून यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता ज्या महिलांकडे आधिवास प्रमाणपत्र नसेल, अशा महिलांना पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला या चार कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आधीवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी पाच एकर शेतीची अट ठेवण्यात आली होती. मात्र ही अट देखील या योजनेतून आता वगळण्यात आली आहे. त्याचबरोबर वयाच्या अटीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान असणे आवश्यक आहे. या पूर्वी हे वय 21 ते 60 वर्षे इतके ठेवण्यात आले होते.

या महीलांना मिळणार नाही लाभ

ज्या महिलाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

त्यांचा नावावर चार चाकी वाहन आहे, अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. चार चाकांच्या वाहनांमधून ट्रॅक्टरला मात्र सूट देण्यात आली आहे. ज्या महिला शासकीय सेवेत कर्मचारी आहेत, अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्ज कुठे आणि कसा कराल..?

इच्छुक आणि पात्र महिला लाभार्थ्यांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे शक्य नाही, अशांना अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील अर्ज जमा करता येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर, पावती घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा physical relationship tips: आठवड्यातून किती वेळा संबंध ठेवणे मानले जाते योग्य; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर..

Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.