Manoj jarange Maratha Reservation : मुंबईत जाऊन गुलाल उधळला, मग आता उपोषण का करतायत जरांगे पाटील? वाचा सविस्तर..

0

Manoj jarange Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) गेल्या काही महिन्यांपासून राज्यातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे (manoj jarange patil) देशातल्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार केला. हजारोंच्या संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र वीस तारखेला आझाद मैदानावर पोहोचण्यापूर्वी सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या केल्या. साहजिकच त्यामुळे मराठा समाजाकडून गुलाल देखील उधळण्यात आला. असं असलं तरी मनोज जरांगे आता पुन्हा उपोषणाला बसल्याने, अनेकांमध्ये संभ्रमता निर्माण झाली आहे. गुलाल उधळल्यानंतरही मनोज रंगे उपोषणाला का बसलेत? जाणून घेऊया सविस्तर..

मराठा आरक्षण हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा विषय आहे. मात्र मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर या आरक्षणाला अधिक धार मिळाली. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरंगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू केलं. पोलिसांकडून मात्र मनोज जरांगे यांचे उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक महिला वयोवृद्ध मंडळी यांच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने, या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले.

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन, मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा. मनोज जरांगे यांच्या या मागणीमुळे सरकार पुढे मोठं आव्हान उभे राहिले. पुढे चर्चेनंतर कुणबी नोंदी असणाऱ्या मराठ्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देऊन, ओबीसीमध्ये समावेश करावा. अशा स्वरूपाच्या चर्चेची समाप्तीही झाली. सरकारने देखील ही मागणी मान्य केली. मात्र आता सरकारने शब्द फिरवल्याने, मनोज जरांगे यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.

सरकारकडून ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाहीत, अशांना मराठा म्हणून वेगळं आरक्षण देऊ, अशी घोषणा केली आहे. मात्र मनोज जरांगे यांनी ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत, त्या मराठ्यांच्या नातेवाईकांना सगेसोयरे यांना शपथपत्रासह कुणबी प्रमाणपत्र देऊन,ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात यावा. या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यामध्ये मराठा आरक्षण हा संघर्ष अजूनही कायम आहे.

मराठा समाज 20 जानेवारीला आझाद मैदानावर पोहोचण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. दोन दिवसात अधिवेशन घेऊन, या संदर्भात जीआर काढण्यात येईल असे, देखील सांगण्यात आलं. मात्र अद्यापही अधिवेशन घेण्यात आलं नसल्याने, आणि निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने,मनोज जरांगे अन्नत्याग उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असून, नाकातून रक्त देखील येत आहे.

हे देखील वाचा  Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

Wedding : निमंत्रणाशिवाय लग्नात जेवणं हा गंभीर गुन्हा! तब्बल इतक्या वर्षांच्या शिक्षेची तरतूद; जाणून घ्या कायदा..

Kitchen Hacks : सावधान..! तुमचाही गॅस बर्नर कमी चालतो? आजच चेक करा या गोष्टी अन्यथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.