Methi Water Benefits : फक्त दोन महिने असे प्या मेथीचे पाणी; शरीरात होतील हे आश्चर्यकारक बदल..

0

Methi Water Benefits : मेथीचे (Fenugreek Seeds) अनेक उपयोग अनेकांना माहिती असतील. मात्र आरोग्यावर देखील मेथी रामबाण उपाय आहे. अनेकांना याविषयी माहिती नसेल. मात्र मेथी आरोग्यासाठी एक वरदान असून, शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल करण्याची किमया मेथीच्या दाण्यामध्ये आहे. प्रचंड धावपळीमुळे अलीकडे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवताना पाहायला मिळतात. खासकरून पोटाच्या समस्या प्रामुख्याने होत असल्याचं पाहायला मिळतं.

धावपळ, जेवणाची बदलती वेळ, आणि बैठयाकामामुळे पोटाची समस्या प्रामुख्याने उद्भवते. साहजिकच धावपळीमुळे व्यायामाला देखील पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी पोटाच्या समस्येमुळे इतरही आजार जडण्याची भीती असते. या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे, मेथीच्या दाण्याचे पाणी. मेथीच्या दाण्याच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केल्याने, तुमच्या शरीरात अमुलाग्र बदल धडतात. जाणून घेऊया, मेथीच्या दाण्याच्या पाण्याचे सेवन कसं करायचे? आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम..

अनेक पदार्थांना चविष्ट बनवण्यासाठी मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो. मेथीच्या दाण्याची फोडणी देऊन देखील अनेक भाज्या बनवतात. मात्र याशिवाय मेथी आरोग्यासाठी देखील प्रचंड लाभदायी आहे. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, सोडियम, लोह, पोटॅशियम कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी असे असंख्य पोषक घटक मेथीमध्ये आढळतात. त्यामुळे पचनसंस्थेच्या समस्या आणि मधुमेहावर नियंत्रण राखण्यास मदत होते.

मेथीचे पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे, मेथी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवून, सकाळी त्या पाण्याचे सेवन उपाशीपोटी करा. चांगल्या निकालासाठी तुम्ही रात्री भिजत ठेवलेली मेथी सकाळी उकळवून देखील घेऊ शकता. हा प्रयोग तुम्ही दोन महिने नियमित केला, तर तुम्हाला पोटाच्या अनेक समस्येपासून सुटका मिळेल. बद्धकोष्ठता, गॅस अपचन यासारख्या समस्या दूर होतील. मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने, मल मऊ होते. साहजिकच त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

मेथीचे पाणी नियमित पिल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स यासारख्या समस्या पासून आराम मिळतो. कोणत्याही प्रकारच्या स्कीन एनर्जी पासून देखील मेथी पाण्याच्या सेवनाने मुक्ती मिळते. जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल तरीदेखील मेथीच्या पाण्यामुळे सर्दी खोकला जाण्यास मदत होते.

वजन कमी करणे हे अनेकांपुढे मोठं आव्हान असते. जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल, तर मेथीचे पाणी मदत करेल. मेथीच्या पाण्याचे नियमितपणे सेवन करून तुम्ही वेटलॉस करू शकता. मेथीमध्ये फायबर असल्याने, पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील मेथीचे पाणी वरदान ठरते. मेथीमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते.

हे देखील वाचा ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

Onion export ban : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? जाणून घ्या केंद्र सरकारचा प्लॅन..

Ricky ponting on Rishabh pant: ऋषभ पंत खेळणार; रोहित शर्मा कर्णधार? कोच पाँटिंगकडून आयपीएल प्लॅन विषयी खुलासा..

Virat Kohli miss out: विराट कोहलीचे कमबॅक लांबणीवर; जाणून घ्या विराट कधी परतणार मैदानावर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.