U19 World Cup 2024 : बीडच्या सचिन धसमुळे भारत फायनलमध्ये; कोण आहे सचिन धस? तेंडुलकरशी आहे खास नातं..

0

U19 World Cup 2024 : काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय (IND vs SA under 19 World Cup 1st semi final) संघाने दमदार विजय संपादन करत अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. (Under 19 World Cup final) भारताच्या अंडर १९ संघाने आतापर्यंत तब्बल 11 वेळा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा कारणामा केला आहे. आतापर्यंत भारताच्या 19 वर्षाखालील संघाने पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. अंडर नाईन्टीन संघाचा कर्णधार उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय संघाला सहाव्यांदा विश्वविजेता होण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाने प्रवेश केला असला तरी, एक वेळ भारतीय संघाची अवस्था 4 बाद 32 अशी झाली होती. भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय संघासमोर 244 धावांचे आव्हान उभे केले.

245 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारच निराशाजनक झाली. एकवेळ 4 बाद 32 अशा बिकट परिस्थितीतून भारतीय संघाचा संकट मोचक म्हणून सचिन धस (sachin dhas) उभा राहिला. आणि भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला. मैदानात येताच आक्रमक फटकेबाजी करत सचिन धसने दमदार खेळी साकारली. अवघ्या चार धावांनी त्याचे सलग दुसरे शतक हुकले. मात्र तोपर्यंत त्याने भारतीय संघाला विजयासमिप नेहून ठेवलं होतं.

सेमी फायनलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे सचिन धस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेडिंगवर राहिला. अनेकांनी सचिन धस कोण आहे, याचा शोध देखील घ्यायला सुरुवात केली. तर सचिन धस हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा (beed) रहिवासी आहे. सचिनच्या वडिलांचे नाव संजय दस (Sanjay dhas) असून त्यांना क्रिकेटची लहानपणापासून आवड आहे. राज्यस्तरीय कबड्डीपटू म्हणून देखील ते परिचित आहेत.

लहानपणापासून सचिनचे वडील संजय धस हे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याचे लहानपणापासून चाहते राहिले आहेत. त्यामुळे मुलगा झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव सचिन तेंडुलकरच्या नावावरून सचिन असं ठेवलं. सचिन धसची आई सहायक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत देखील आहे. लहानपणापासूनच सचिनला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं. जे आता सत्यात उतरले आहे.

2024 च्या अंडर नाईन्टीन विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. या स्पर्धेचा दुसरा सेमी फायनल सामना 8 तारखेला खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये दुसरा सेमी फायनल सामना खेळून जाणार असून, विजयी संघाची लढत भारतासोबत रविवारी 11 तारखेला खेळवली जाणार आहे.

हे देखील वाचा  ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

England team leaves India : दुसऱ्या कसोटीनंतर या कारणामुळे इंग्लंडने सोडला भारत; कारण जाणून तुम्हीही..

IND Squad For Last 3 Tests vs ENG : या तीन खेळाडूंच्या निवडीवर मैदानातच गंभीर चर्चा; रोहीत शर्मा, राहुल द्रविड, आगरकर यांचा प्लॅन समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.