अतिवृष्टी भागाची शरद पवार करणार पाहणी!

0

आठ दहा दिवस परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आठ आठ दिवस शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशा उगवून आल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली. महाविकास आघाडी सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. अठरा आणि एकोणीस तारखेला शरद पवार हे मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

शरद पवार हे मराठवाड्यातील दौऱ्यावर गेल्यानंतर शेतकऱ्यांविषयी माध्यमांसमोर काय बोलतील हे पाहणं शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.