ENG vs IND 1st test: विराट कोहलीच्या मित्रासाठी पुन्हा त्याला डावलले; हा आहे पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ..

0

ENG vs IND 1st test: बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असणाऱ्या कसोटी मालिकेला अखेर उद्यापासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी (India vs England five test match series) सामन्याच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार असली तरी पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) नसणार आहे. विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामने खेळणार नसल्याने, भारतीय संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (world test championship) दृष्टीने या मालिकेला विशेष महत्त्व आहे. विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये देखील आहे. दुसरीकडे मात्र भारतीय फलंदाज फारसे लईत नाहीत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात विराट कोहली नसल्याने त्याच्या जागेवर आता रजत पाटीदारची (Rajat Patidar) निवड करण्यात आली आहे. या संदर्भात क्रिकबझ वृत दिले असून, पुन्हा एकदा सरफराज खानला डावलण्यात आले आहे.

रजत पाटीदारचा देखील रणजी आणि इंडिया अ संघाकडून खेळताना दमदार परफॉर्मन्स राहिला आहे. मात्र सरफराज खानने (sarfraaz khan) 44 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तब्बल 68.20 इतकी सरासरी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज खान सरासरीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तरी देखील सरफराज खानला अद्याप भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही.

2022 मध्ये सरफराज खाने तब्बल 982 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या सत्रामध्ये देखील त्याने केवळ नऊ डावात 556 धावा करण्याचा कारणामा केला होता. तर इंग्लंड विरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना 96 आणि 55 धावा देखील पटकावल्या होत्या. एकीकडे सरफराज खाने दमदार कामगिरी करून देखील त्याला पुन्हा एकदा डावलल्याने आता निवड समितीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

उद्यापासून पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल, श्रीकर भरत रविद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह अशा प्लेइंगसह भारतीय संघ मैदानात उतरू शकतो.

हे देखील वाचा Women interest men: या पुरुषांची महिलांवर असते कायम जादू; महिलांना आवडणाऱ्या पुरुषांची यादी धक्कादायक..

Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.