IND vs AFG 3rd T20: शुभमन सोडा, यशस्वी जयस्वालचे स्थानही धोक्यात; काय आहे प्लेइंग 11 चे गणित..
IND vs AFG 3rd T20: उद्या भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20 series) विरुद्ध तिसरा आणि अखेरचा t20 सामना पार पडणार आहे. बॅगलोरच्या मैदानावर हा सामना होणार असल्याने, या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तीन T20 सामनाच्या मालिकेत भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. उद्या अखेरचा t20 सामना जिंकून अफगाणिस्तानला व्हाइट वॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिका विजयाचे महत्त्व फारसं नसलं तरी आगामी मी टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेला प्रचंड महत्व होतं. या मालिकेत परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंकडे आगामी टी-20 विश्वचषक संघामध्ये पर्याय म्हणूनही पाहिलं जात आहे. त्यामुळे या मालिकेला विशेष महत्त्व आहे. अनेकांनी आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी आपली दावेदारी निश्चित केली. तर काहींना आपली जागा निश्चित करण्यात अपयश आलं.
विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) T20 संघात वापसी झाल्याने, अनेक नवीन खेळाडूंची T20 विश्वचषक खेळण्याची संधी हुकणार आहे. प्रामुख्याने यामध्ये ईशान किशन (ishan Kishan) यशस्वी जयस्वाल (yashaswi jaiswal) शुभमन गिल (shubman gill) या तिघांपैकी दोघांचा पत्ता कटणार आहे. तिघांपैकी केवळ एकालाच भारताच्या पंधरा सदस्य संघात संधी मिळेल. मात्र प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही, याविषयी देखील अद्याप स्पष्टता नाही. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर आयडली फिनिशिअर म्हणून रिंकू सिंहने आपली जागा निश्चित केली आहे.
शेवटच्या षटकात डावाला आकार देणारा, तसेच फिनिशिंग रोल पार पाडणारा फलंदाज सध्यातरी भारतीय संघाकडे नाही. त्यामुळे रिंकू सिंहला अधिक महत्त्व आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत रिंकू सिंहला (Rinku Singh) टी-ट्वेंटी विश्वचषक संघात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. रिंकू सिंगला भारताच्या प्लेइंग 11 मध्ये जागा निश्चित करून देण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला ओपन करावं लागणार आहे. या संदर्भात टीम मॅनेजमेंट, निवड समिती आणि BCCI यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) ट्वेंटी संघात पुनरागमन होणार आहे. दुसरीकडे शिवम दुबेने (shivam Dube) हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) जागा भरून काढली आहे. दुबेने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये काहीशा उणीवा आहेत. मात्र फलंदाजीमध्ये शिवम दुबे हार्दिक पांड्याला देखील वरचड ठरला आहे.
त्यामुळे भारताकडे हार्दिक पांड्याचा पर्याय तयार झाला आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने सलामी दिली, तर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. मात्र सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर रिंकू सिंहला खेळण्याची संधी मिळणार नाही.
रोहित आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले, तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चार सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबे, सहाव्या क्रमांकावर एक विकेटकीपर फलंदाज, सातव्या क्रमांकावर रिंकू सिंह, आठव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा अक्षर पाटील यापैकी एक. अशा प्रकारचा बॅटिंग ऑर्डर असेल.
परंतु या कॉम्बिनेशनमुळे भारताला शिवम दुबे, रवींद्र जडेजासह पाचच बॉलिंग ऑप्शन मिळणार आहेत. हा कॉम्बिनेशन प्रचंड आव्हानात्मक असल्याने, विराट आणि रोहितला ओपनिंग करावी लागणार आहे.
हे देखील वाचा Virat Kohli IND vs AFG: प्लेइंग 11 चे हे गणित यशस्वी जयस्वालचा घेणार बळी; विराट कोहलीचा इंटेंटही मोठा फॅक्टर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम