Rohit Sharma MI ..अन्यथा बेंचवर बसेन! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास रोहितचा नकार; पर्याय संपल्याने मुंबईने उचलले मोठे पाऊल..
Rohit Sharma MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मामध्ये सगळं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या बरोबर देखील रोहित शर्माचे मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध खेळलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आयपीएल 2024 ची लिलाव( IPL auction 2024) प्रक्रिया पूर्ण पडली असली तरी अजूनही खेळाडूंना कोणत्याही संघात जाण्याचा पर्याय शिल्लक आहे. आयपीएल सुरू होण्याचा एक महिना अगोदरपर्यंत खेळाडूंना कोणत्याही संघात ट्रेडच्या (ipl trade window) माध्यमातून जाता येणार आहे. मात्र या प्रोसेससाठी मूळ संघ मालकाची सहमती हवी असणार आहे. आता पुन्हा ट्रेड प्रक्रियेची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा या तिघांची एकमेकांविषयी असणारी नाराजी.
2024 च्या आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अचानक हार्दिक पांड्याला केल्याने रोहित शर्मा !Rohit Sharma) प्रचंड नाराज आहे. रोहित शर्माची नाराजी रितिकाने उघडपणे व्यक्त देखील केली आहे. आतापर्यंत केवळ रोहित शर्माकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. रोहीतच्या नाराजीवर मुंबई इंडियन्सने मौन बाळगत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र मुंबई इंडियन्सने देखील आपला संयम सोडला आहे.
कर्णधार पदावरून हकलपट्टी केल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर रोहित शर्मा सहमत नसून, रोहितने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मी खेळणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे. रोहित शर्माने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे मुंबई इंडियन्सने देखील आपला संयम सोडत, रोहित शर्माला डिवचून घरचा आहेर दिला आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यानंतर भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. संघ जाहीर होताच मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय कसोटी संघ पोस्ट केला. मात्र रोहित शर्मा कर्णधार असतानाही रोहीतचा फोटो न वापरता केएल राहुल, श्रेयस अय्यर, बुमराह या तिघांचे फोटो वापरले. साहजिकच त्यामुळे रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने देखील अखेर घरचा आहेर दिल्याचे स्पष्ट झाले.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणं शक्य नसल्याचे रोहितने मुंबई इंडियन्स फ्रेंचाईजीला कळवले आहे. जर मी कर्णधार नसेल, तर मला ट्रेडच्या माध्यमातून इतर संघात खेळण्यासाठी सोडण्यात यावं, असंही रोहित शर्माने कळवलं आहे. जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला ट्रेड केले नाही, तर नाईलाजाने रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्येच राहावे लागणार आहे. मात्र रोहित शर्माने यावर देखील तोडगा काढला आहे. जर तुम्ही मला इतर संघात खेळण्यासाठी सोडलं नाही. तर मी संपूर्ण सिझन बेंचवर बसेल. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळू शकणार नाही. अशी स्पष्ट भूमिका रोहित शर्माने घेतली आहे.
रोहित दिल्लीकडून खेळणार..
रोहित शर्मा, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी तयार नसल्याने अखेर मुंबई इंडियन्सने देखील आपले हात टेकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा सोबत सौरभ गांगुलीने (sourav ganguly) देखील बातचीत केली आहे. सौरभ गांगुली आणि रोहित शर्माचे संबंध अतिशय उत्तम असून, दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर देखील गांगुली कडून देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई इंडियन्स देखील नाईलाजाने आता रोहित शर्मा ट्रेडच्या माध्यमातून दिल्लीला देण्यासाठी तयार आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma vs Hardik Pandya: मुंबई इंडियनच्या पोस्ट मधून रोहित शर्मा गायब होण्याचं धक्कादायक कारण समोर..
Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम