BCCI On Virat Kohli Rohit Sharma: ओपन करून या अपेक्षा पूर्ण करा अन्यथा..; विराट रोहीतला BCCI ची ताकीद..

0

BCCI On Virat Kohli Rohit Sharma: अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या (ind vs AFG 1st T20) तीन t20 सामन्याच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) एका वर्षानंतर टी-ट्वेंटी संघात वापसी झाल्याने, या दोघांच्याही खेळाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मात्र पहिल्या t20 सामन्यातून विराट माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण देत विराट पहिला टी ट्वेंटी सामना खेळणार नाही. 2022 नंतर हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व देण्यात आले. मात्र आता अचानक रोहित शर्माची कर्णधारपदी निवड केल्याने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माला भारतीय टी-ट्वेंटी संघात पुन्हा संधी दिल्याने, अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. जर विराट आणि रोहितला टी-ट्वेंटी संघात पुन्हा सामील करायचं होतं, तर 2022 नंतर झालेल्या एकाही टी-ट्वेंटी सामन्यात का खेळवले नाही. जर दोघेही खेळले असते, तर 2024 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाची तयारी करण्यासाठी दोघांनाही पुरेसा वेळ मिळाला असता. असंही बोललं जात आहे. मात्र या दोघांना टी-ट्वेंटी संघात सामील करून घेण्यासाठी बीसीसीआयचा प्लॅनही समोर आला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही टी ट्वेंटीमध्ये सामील केल्यामुळे भारतीय टी ट्वेंटी संघाचे गणित कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये रिंकू सिंहने (Rinku Singh) दमदार फलंदाजीचा प्रदर्शन करत सामन्याचा शेवट उत्कृष्टरित्या पार पाडला आहे. भारतीय संघाकडे फिनिशरचा रोल पार पाडणारा एकही फलंदाज नसल्याने, रिंकू सिंगचे महत्त्व अधिक वाढलं आहे. मात्र विराट रोहितची टी ट्वेंटी संघात वापसी झाल्याने, रिंकू सिंहचे प्लेइंग 11 चे स्थान धोक्यात आले आहे.

बीसीसीआय, रोहित आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या मीटिंगमध्ये रिंकू सिंहला भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कशी संधी मिळेल, याविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. बीसीसीआयने रोहित आणि विराट दोघांनाही तुमच्या खेळण्याचा अप्रोच बदलावा लागणार असल्याचं सूचित केले आहे. याशिवाय दोघांना टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ओपन करावं लागेल, केवळ ओपन नाही, तर आक्रमक फटकेबाजी करून संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी दोघांच्याही खांद्यावर बीसीसीआयने टाकली असल्याची माहिती आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन t20 सामन्यांमध्ये रोहित आणि विराट दोघेही अपयशी ठरले, तर आयपीएलच्या फॉर्मवर आगामी t20 विश्वचषकात या दोघांनाही संधी द्यायची की नाही, हे ठरवलं जाणार आहे. मात्र जर दोघांनी अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये BCCI ला अपेक्षित असणारी कामगिरी केली, तर मात्र या दोघांची निवड आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकात निश्चितपणे केली जाणार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..

Rahul Dravid on Ishan Kishan: ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई का केली? द्रविडने पत्रकाराच्या प्रश्नाचा एका वाक्यात विषय मिटवला..

Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.