Rahul Dravid on Ishan Kishan: ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई का केली? द्रविडने पत्रकाराच्या प्रश्नाचा एका वाक्यात विषय मिटवला..

0

Rahul Dravid on Ishan Kishan: आज भारत आणि अफगाणिस्तान (ind vs AFG 1st T20) विरुद्ध पहिला टी ट्वेंटी सामना मोहोलीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तीन T20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टी ट्वेंटी सामन्यापूर्वी काल राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आगामी T20 संघाची रणनीती त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या संघ निवडीवर देखील राहुल द्रविडने (Rahul Dravid) भाष्य केलं.

विराट कोहली (Virat kohli) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) भारतीय टी-ट्वेंटी संघात निवड जितकी आश्चर्यकारक होती, त्याहून अधिक आश्चर्यकारक ईशान किशनला (ishan Kishan) बाहेरचा रस्ता दाखवणं होतं, असं अनेकांकडून बोललं गेलं. एकीकडे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (kl Rahul) असे अनेक खेळाडू अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजचा भाग नसतानाही ईशान किशनची निवड का केली गेली नाही, हा मोठा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. आता मात्र या प्रश्नावर राहुल द्रविन पडदा टाकला आहे.

भारतीय टी ट्वेंटी संघात निवड न झाल्यामुळे ईशान किशन विषयी अनेक सुलट चर्चा रंगल्या. अनेकांनी ईशान किशनवर बीसीसीआयने (BCCI) शिस्तभंगाची कारवाई केली असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक आरोग्याचे कारण देत ईशानने माघार घेतली. बीसीसीआयने देखील ईशानची रजा मंजूर केली. मात्र दक्षिण आफ्रिकेचा दौरा चालू असतानाच, दुबईमध्ये ईशान किशन पार्टी करताना दिसला. (Ishan Kishan Dubai party)

एकीकडे मानसिक आरोग्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली, आणि दुसरीकडे ईशान किशन पार्टी करत असल्याने बीसीसीआयने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केल्याचं बोललं गेलं. पत्रकार परिषदेत राहुल द्रविडला पत्रकाराने ईशान किशनवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे का? असा प्रश्नही विचारला. मात्र या प्रश्नाचे खंडन करत राहुल द्रविडने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले.

राहुल द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, ईशान किशन हा या दौऱ्यासाठी उपलब्ध नव्हता. त्याने वैयक्तिक कारणामुळे रजा घेतली आहे. आणि म्हणून त्याची अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजसाठी निवड करण्यात आली नाही. शिस्तभंगाची कारवाई वगैरे या सगळ्या अफवा असून, यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे राहुल द्रविडने म्हटले.

हे देखील वाचा Virat Kohli drop out T20I: विराट कोहलीने मारून घेतला स्वतःच्या पायावर धोंडा; विराट T20 मधून बाहेर! कारणही समोर..

AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..

Ishan Kishan BCCI: होय BCCI ला गंडवल्यामुळे इशान किशनला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या ते प्रकरण..

Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.