Chanakya on money: चाणक्यांची ही गोष्ट पाळा खिसा कायम राहील गरम; अन्यथा आयुष्यभर कराल वणवण..
Chanakya on money: श्रीमंत व्हायला कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आपणही श्रीमंत असावं असं वाटत असतं. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा येतोच असं नाही. अगदी प्रचंड मेहनत करून देखील अनेक जणांना पैशाची चणचण कायम भासते. हे तुम्हाला पटत असलं तरी पैशाची चणचण भासण्याला स्वतः तुम्ही जबाबदार असता. आचार्य चाणक्य यांनी याविषयी आपलं मत सविस्तरपणे मांडले आहे, जाणून घेऊया अधिक..
आचार्य चाणक्य (acharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं, या गोष्टीचा देखील चाणक्यांनी सविस्तरपणे उलगडा केला आहे. आचार्य चाणक्य सांगतात माणसाने नेहमी आनंदी राहिला शिकलं पाहिजे, घरात जर वादविवाद होत असतील, तर लक्ष्मी वास करत नसल्याचं चाणक्य सांगतात.
घरात कधीही भांडणे असायला नको. घरातील वातावरण हे नेहमी आनंदी असायला हवं. घरात आणि आपल्या परिसराची स्वच्छता देखील उत्तमरित्या असणे आवश्यक आहे. असं चाणक्य सांगतात. जर तुम्ही स्वच्छता सांभाळली, नाही तर लक्ष्मी तुमच्यावर कायम नाराज राहते. ज्यामुळे देखील तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं चाणक्य सांगतात.
चाणक्य सांगतात, परिस्थिती ही कायम आहे अशीच राहत नाही. आयुष्यामध्ये चढउतार हे येत येत जात राहतात. जेव्हा तुमच्या आयुष्यात आव्हानात्मक परिस्थिती असेल, तेव्हा तुम्ही परिस्थितीचा धर्याने सामना करणे आवश्यक असतं. जेव्हा तुमची वेळ चांगली असते, तेव्हा तुम्ही पैशाची बचत करणं आवश्यक असते. जेणेकरून वाईट काळात तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल.
माणसाला आयुष्यात पैशाचे महत्व योग्य वेळी कळणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला पैशाचे महत्त्व योग्यवेळी कळले नाही, तर तुमच्या आयुष्यात कायम पैशाची कमतरता राहते. असं चाणक्य सांगतात. पैशाचे महत्व जर तुम्हाला योग्य वेळी कळालं, तर तुम्ही पैसा हा खर्च करताना अनेकदा विचार करता. जर तुमचं खर्चावर नियंत्रण असेल, तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, असं चाणक्य सांगतात.
हे देखील वाचा Flipkart Big Bachat Dhamaal Sale : होय smartphone, laptop, earbuds खरेदीवर 80 टक्के सूट..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम